वेस्ट इंडिजने टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकलाय. विंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. विंडिज विरुद्ध टीम इंडियाच्या 2 युवा खेळाडूंचं पदार्पण झालंय.
यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन या दोघांनी टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केलंय. बीसीसीआयने ट्विट करत याबबातची माहिती दिली आहे.
यशस्वी जयस्वाल याने कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे.
तर इशान किशन याने याआधी टीम इंडियाचं टी 20 आणि एकदिवसीय मालिकेत प्रतिनिधित्व केलंय.
टीम इंडियासाठी पदार्पण केल्यानंतर यशस्वी आणि इशान या दोघांचं सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं.