कोरोनाचा कठीण काळ आणि त्यात आर्थिक मंदी आपण सगळ्यांनी पाहिली. अशात नोकरी मिळणं आणि व्यवसाय करणं मोठं कठीण होऊन बसलं आहे. देशात असे अनेक सुशिक्षित तरुण आहेत ज्यांची नाळ अद्यापही आपल्या मातीशी जोडली आहे. अनेकांनी व्यवसाय म्हणून शेतीचा (Farming) पर्याय निवडला आहे.
ज्यामध्ये आधुनिकतेचा वापर करून आपण चांगला पैसा कमावू शकतो. आम्हीही तुम्हाला असाच एक व्यवयासायाचा उत्तम पर्याय देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही कमी पैशात जास्त कमाई करू शकता.
या व्यवसाय म्हणजे एक्झॉटिक वेजिटेबल बटण मशरूम (Button Mushroom). रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससाठी मशरूमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हल्ली युट्यूबमधून याची शेती करण्याची टेकनिक शिकून अनेक तरुण हा व्यवसायात उतरले आहेत.
बटण मशरूम ही एक अशी प्रजाती आहे ज्यामध्ये भरपूर खनिजं (Minerals) आणि जीवनसत्त्वं (Vitamins) आहेत. या फायद्यांमुळे मशरूमची मागणी वाढत आहे.
50 हजारांवर कमावले 2.50 लाख रुपये - बटण मशरूमच्या लागवडीसाठी कंपोस्ट तयार करण्याची आवश्यकता आहे.
एक क्विंटल कंपोस्ट 1.5 किलो बियाणे घेतं. 4 ते 5 क्विंटल कंपोस्ट बनवल्यानंतर सुमारे 2 हजार किलो मशरूम पिकवता येईल.
फक्त 1 लाखात सुरु करा हा बिझनेस, प्रति महिना कमाव 10 लाख रुपये
कमी जागेत सुरू करा मशरूमची शेती- प्रति चौरस मीटरमध्ये तुम्ही 10 किलो मशरूम आरामात उगवू शकता. कमीतकमी 40×30 फूट जागेत तीन ते तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूम शेती करू शकता.