टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये तिसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. बुधवारी नव्याने रँकिंगची यादी प्रसिद्ध झाली. सूर्यकुमारच्या क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा झाली. 780 रेटिंग पॉइंटसह तो तिसऱ्या नंबरवर पोहोचलाय. (PTII)
सूर्यकुमार यादवने बाबर आजमला पिछाडीवर टाकलय. इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 मध्ये बाबर आजम फ्लॉप ठरला. बाबरची चौथ्या स्थानावर घसरण झालीय. त्याचे 771 रेटिंग पॉइंटस आहेत. (PTII)
बाबर आजमने इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 मध्ये 24 चेंडूत 31 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट पुन्हा एकदा 130 पेक्षा कमी होता. (AFP)
वेगवान सुरुवातीनंतर बाबर आजम पुन्हा एकदा फसला. अखेरीस पाकिस्तानी टीमने 158 धावा बनवल्या. इंग्लंडने हे लक्ष्य आरामात पार केलं.
आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये हार्दिक पंड्याच्या क्रमवारीत सुद्धा दोन स्थानांची सुधारणा झालीय. पंड्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 30 चेंडूत नाबाद 71 धावा फटकावल्या. हार्दिकचा टॉप 5 टी 20 ऑलराऊंडर्समध्ये समावेश झाला आहे. त्याने मॅक्सवेल आणि जे जे स्मिटला मागे टाकून टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे.