सध्या सूर्यकुमार यादवचीच चर्चा आहे. कारण त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. ऑस्ट्रेलियानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन अर्धशतकं झळकवली आहेत. त्याच्या फॉर्मची क्रिकेट जगतात चर्चा आहे. सूर्यकुमारने त्याच्या ह्दयावर एक टॅटू गोंदवलय. त्याची सुद्धा तितकीच चर्चा आहे. (PTI)
सूर्याला टॅटूची खूप आवड आहे. त्याच्या शरीरावर जवळपास 18 टॅटू आहेत. खांद्यावर त्याने आई-वडिलांचा चेहरा गोंदवला आहे.
मोटिवेशन शिवाय तारे, डायमंड, रोज, मोओरी फेस, असे टॅटू सुद्धा गोंदवलेत. त्याने ह्दयावर एक टॅटू गोंदवला आहे.
सूर्याला त्याच्या आय़ुष्यात काही धडे मिळाले. त्याची आठवण रहावी म्हणून त्याने टॅटूच्या स्वरुपात शरीरावर गोंदवले आहेत. म्हणजे प्रत्येकवेळी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल.
सूर्याने त्याच्या ह्दयावर देविशाचा नाव गोंदवलय. त्याचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे. 7 जुलै 2016 रोजी त्याने देविशा बरोबर लग्न केलं. त्यानंतर काही दिवसांनी 23 जुलैला त्याने टॅटूचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला होता.