Marathi News Photo gallery Taarak Mehta Ka Ooltah Chashma Munmun Dutta & Raj Anadkat get engaged in Vadodara babita & tapu
TMKOC Munmun Dutta | सीरीयलमध्ये टपूसाठी बबिता आंटी, पण खऱ्या आयुष्यात टिपेंद्रची भावी पत्नी
पडद्यावर काम करताना काही पात्रांच्या वयामध्ये मोठ अंतर असलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र ही कॅरेक्टर्स परस्परांची जोडीदार असतात. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याच समजल्यानंतर प्रेक्षकांना धक्का बसतो. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा अशीच बातमी आहे, ज्यावर विश्वास ठेवण त्यांच्यासाठी कठीण आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या चांगलं लक्षात आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना भरभरुन हसवलय.
याच मालिकेतील बबिताजी म्हणजे मुनमुन दत्ता आणि अय्यर यांची नवरा-बायकोची परस्पर विरुद्ध जोडी, सोबत जेठालाला या तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. विवाहित असूनही जेठालाल यांना बबिता बद्दल असलेलं आकर्षण यातून अनेक विनोदाची निर्मिती होते.
ही मालिका आता काहीवर्ष पुढे गेली असून या सीरीयलमधील जेठालाल यांचा मुलगा टिपेंद्र ऊर्फ टपू आता मोठा झालाय. सीरीयलमध्ये काम करताना मुनमुन आणि राजा अनाडकट उर्फ टपू यांच्यात अफेअर सुरु झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झालेल्या.
त्यावेळी मुनमुन दत्ताने या सर्व चर्चा म्हणजे निव्व्ळ अफवा असल्याच सांगून राजसोबत प्रेमाची चर्चा फेटाळून लावली होती. आमच्यात असं काही नाहीय, असं मुनमुनने म्हटलं होतं.
आता मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट म्हणजे मालिकेतील बबिताजी आणि टपू यांचा खऱ्या आयुष्यात साखरपुडा झालाय. गुजरात वडोदरा येथे हा साखरपुडा संपन्न झाला, असं न्यूज 18 ने वृत्त दिलय.