दिवसाची सुरूवात चांगली व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो. मात्र दिवस संपताना काय करावे याकडे कोणी फारसं लक्ष देताना दिसत नाही. रात्री झोपण्यापूर्वी बरेच जण अंघोळ करणं पसंत करतात. मात्र ते योग्य आहे की अयोग्य ? त्याने काय फायदे मिळतात, हे जाणून घेऊया.
झोपण्यापूर्वी अंघोळ केल्यास दिवसभर आलेला थकवा कमी बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. झोप नीट पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी आपलं मन आणि शरीर दोन्ही फ्रेश राहतं.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्यास रक्ताभिसरण सुधारते. आपलं शरीर रिलॅक्स होतं आणि नसापर्यंत रक्त अधिक सुरळीतपणे पोहोचते.
असं म्हटलं जातं की, रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने त्या व्यक्तीला मानसिक रित्याही छान, रिलॅक्स वाटतं. एवढंच नव्हे तर त्यामुळे आपली त्वचा आणि केसही हेल्दी होतात. कारण त्यावर दिवसभर साठलेला मळ, घाण दूर होते.
अंघोळ गरम पाण्याने करावी कि थंड हे प्रत्येक व्यक्तीवर अवंलबून असते. पण थोड्या गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्याचे जास्त फायदे मिळू शकतात. त्यामुळे आपल्या स्नायूंना आराम मिळतो आणि चांगली झोपही येते.