भाईसारखी चालतेस, जरा मुलींसारखी..; प्रसिद्ध अभिनेत्रीला ऐकावे लागले टोमणे

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या या अभिनेत्रीचं नाव एकेकाळी क्रिकेटर विराट कोहलीसोबत जोडलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाकलाही डेट केल्याची चर्चा होती. सध्या ही अभिनेत्री एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत आहे.

| Updated on: Dec 21, 2023 | 3:10 PM
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलेल्या अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला. तमन्नाचे कुटुंबीय आधीपासूनच मुंबईत राहायचे. त्यामुळे लहान वयातच तिने फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याची स्वप्नं पाहिली होती. 2005 मध्ये तिने मनोरंजनविश्वात पहिलं पाऊल ठेवलं.

1 / 8
18 वर्षांपूर्वी करिअरची सुरुवात करणाऱ्या तमन्नासाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. तिने लहानपणापासून पृथ्वी थिएटरमधून अभिनयाचे बारकावे शिकले. मात्र बॉलिवूडमधील तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. निर्मात्यांकडे काम मागायला गेल्यावर तिला भलतंच काहीतरी ऐकायला मिळायचं.

2 / 8
34 वर्षीय तमन्नाने आतापर्यंत जवळपास 67 चित्रपटांमध्ये काम केलंय. 2005 मध्ये ती पहिल्यांदा 'इंडियन आयडॉल'चा विजेता अभिजीत सावंतच्या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली होती. 'लफ्जों में..' असं या गाण्याचं नाव होतं. त्याच वर्षी तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'चांद सा रोशन चेहरा' असं या चित्रपटाचं नाव होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला.

3 / 8
पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तमन्नासाठी काम मिळणं खूप कठीण झालं होतं. करिअरमधील मोठ्या बदलासाठी अखेर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथेही तिचा प्रवास काही सोपा नव्हता.

4 / 8
इंडस्ट्रीत सुरुवातीलाच एका दिग्दर्शक-निर्मात्याने तिला म्हटलं, "तू मुलांसारखा डान्स आणि अभिनय करतेस. तू नाचताना किंवा अभिनय करताना त्यात मुलींसारखी अदा आण." तमन्नाने या गोष्टीचाही स्वीकार केला होता की ती तेव्हा मुलांसारखी चालायची. दिग्दर्शकाने ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर तिने स्वत:वर खूप मेहनत घेतली.

5 / 8
तमन्नाने 2006 मध्ये 'श्री' या तेलुगू चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याचवर्षी ती 'कैदी' या तमिळ चित्रपटातही झळकली होती. बॉलिवूडमध्ये तिला जी प्रसिद्धी मिळाली नव्हती, ती अखेर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मिळू लागली. तमिळ आणि तेलुगू प्रेक्षकांमध्ये तमन्ना ही आजसुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहे.

6 / 8
तमन्नाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिचं नाव भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाकशीही जोडलं गेलं होतं. मात्र तमन्नाने या चर्चा फेटाळल्या होत्या. सध्या ती अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे.

7 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमन्नाची एकूण संपत्ती तब्बल 120 कोटी रुपयांच्या घरात आहे. 'बाहुबली 2' या चित्रपटासाठी तिने पाच कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं. सध्याच्या घडीला ती एका चित्रपटासाठी चार ते पाच कोटी रुपये फी घेते.

8 / 8
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.