Marathi News Photo gallery Team india captain rohit sharma wife ritika sajdeh shares instagram story post in solidarity with palestinians all eyes on rafah then deletes it trolled
Rohit Sharma : रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह एका पोस्टमुळे वादात सापडली आहे. ती दोन्ही बाजूंनी ट्रोल झाली. आधी पोस्ट केली म्हणून नंतर पोस्ट डिलीट केली म्हणून. रितिका सजदेह नेहमीच प्रेक्षक स्टँडमध्ये रोहितला सपोर्ट करताना दिसते.
सोशल मीडियावर ‘ऑल आईज ऑन रफाह’ नावाची एक पोस्ट रिलीज झालीय. अनेल सेलिब्रिटींनी ही पोस्ट शेअर केलीय. अभिनेता वरुण धवन, तृप्ती डिमरी यांनी पॅलेस्टाइनच्या समर्थनात इन्स्टाग्रामवर ही स्टोरी शेअर केलीय.
रोहित शर्माची पत्नी रितिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर ही स्टोरी शेअर केली होती. नंतर ही स्टोरी डिलीट केल्यानंतर रितिका सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली.
कधी काश्मिरी पंडितांच्या समर्थनात असं केलय का? पाकिस्तानी, बांग्लादेशी हिंदूंबद्दल बोललीय का? असं काही युजर्सनी विचारलं.
काही युजर्सनी रितिकाने रफाहवर जी पोस्ट केली, त्याच समर्थन सुद्धा केलं. त्यांनी रितिकाच कौतुक केलं.
रितिका तिच्या इन्स्टा स्टोरीमुळे 29 मे रोजी सुद्धा चर्चेत आहे. टि्वटरवर तिच नाव ट्रेंड झालं.