करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नुकताच नागिन 6 मालिका बंद झालीये. नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाश ही मुख्य भूमिकेत होती.
करण कुंद्रा याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट पाहून अनेकांनी तेजस्वी आणि करण यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले. या पोस्टमध्ये त्याने शायदी शेअर केली होती.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या ब्रेकअपची चर्चा जोरदार सुरू होती. ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता एका मंदिरामध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे स्पाॅट झाले आहेत.
मुंबईतील जुहू येथील मंदिरात दर्शनासाठी करण आणि तेजस्वी पोहचले होते. विशेष म्हणजे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे पापाराझी यांना पोझ देताना देखील दिसले.