स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमीच अग्रस्थानी असते. मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात.
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतने वाट पहातोय, तो भावनिक क्षण येत्या 8 जुलैच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पूर्णा आजी सायलीला नातसून म्हणून स्वीकारणार आहे. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे.
खरंतर सायलीने आपल्या प्रेमळ आणि समंजस स्वभावाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सायलीच्या निरागस स्वभावाच्या प्रेमात अर्जुनही पडला. पूर्णाआजीचं मतपरिवर्तन व्हायला मात्र खूप वाट पहावी लागली.
अनेक प्रसंगांमध्ये पूर्णा आजीला सायलीमध्ये तिच्या लाडक्या प्रतिमाचा भास व्हायचा. मात्र तरीही तिने सायलीला नातसूनेचा दर्जा कधीच दिला नाही. आता मात्र पूर्णा आजीला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे.
संपूर्ण कुटुंबासमोर सायलीची माफी मागून पूर्णाआजी घराची जबाबदारी सायलीवर सोपवणार आहे. मालिकेतला हा हळवा क्षण येत्या 8 जुलैच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे.