Photo: हौसेला नाही मोल..! गायीच्या डोहाळे जेवणात गावाचा सहभाग, संस्कृतीचे जतन अन् वेगळेपणही
सांगली : भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळे असे महत्व आहे. त्याचे महत्व तर अबाधित ठेवले जात आहे पण काही शेतकरी गायीचे केवळ पालनच करीत नाहीत तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथे असाच डोळ्याचे पारणे फिटेल असा सोहळा महाशिवरात्रीनिमित्त रंगलेला होता. गावात प्रथमत:च असा आगळा-वेगळा कार्यक्रम संपन्न झाल्याने परिसरात तो चर्चेचा विषय बनला आहे.येथील माजी सरपंच भगवान हारुगडे यांच्या कुटुंबियांनी गायीचेच डोहाळे जेवण घातले आहे. सर्वकाही विधीवत करुन आख्ख्या गावाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. या निमित्त विविध कार्यक्रम हे हारगुडे यांच्या घरी पार पडले.
Most Read Stories