World Richest Families : जगातील कोट्याधीश कुटुंब! यांची एकूण संपत्ती आहे इतकी
World Richest Families : जगात अनेक लखपती, कोट्याधीश, अब्जाधीश आणि त्यापेक्षाही अपार संपत्ती असलेले उद्योजक, उद्योग घराणी आहेत. यामध्ये कोणत्या भारतीय कुटुंबाचा क्रमांक लागला आहे, माहिती आहे का?
नवी दिल्ली : मंदी आणि कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण जगातील काही कुटुंब आज कोट्यवधी, अब्जावधी संपत्तीचे मालक आहेत. जगात अनेक लखपती, कोट्याधीश, अब्जाधीश आणि त्यापेक्षाही अपार संपत्ती असलेले उद्योजक, उद्योग घराणी आहेत. फोर्ब्सच्या बिलिनिअर्स यादीत (Forbes Billionaires List) जगातील 6 सर्वात श्रीमंत कुटुंबाचा समावेश आहे. हे कुटुंब अब्जावधी डॉलरच्या संपत्तीचे मालक आहेत. हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहेत. यामध्ये कोणत्या भारतीय कुटुंबाचा क्रमांक लागला आहे, माहिती आहे का?
जगातील सर्वात मोठे रिटेल चेन वॉलमार्टमध्ये वॉल्टन कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यात त्यांनी मोठा पैसा ओतला आहे. या सर्वात मोठ्या रिटेल कंपनीत या कुटुंबियांची एकूण हिस्सेदारी 50 टक्के इतकी आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 224.5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.
मार्स इंक कंपनीचे मालक मार्स कुटुंबिय जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब आहे. मार्क इंक कंपनीमध्ये या कुटुंबाचा सर्वाधिक हिस्सा आहे. हे कुटुंब फोर्ब्सच्या बिलिनिअर्स यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 215 दशलक्ष डॉलर इतकी आहे.
फ्रेड्रिक, चार्ल्स, डेव्हिड आणि विलियम कोच यांना त्यांच्या वडिलांकडून तेल फर्म वारसा हक्काने मिळाली आहे. कोच इंडस्ट्रीजच्या माध्यमातून या कुटुंबाची मोठी कमाई होते. हे कुटुंब जगातील तिसरे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 128.8 दशलक्ष डॉलर आहे.
गेल्या 90 वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीवर राज्य करणारे अल सऊद कुटुंब हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. या कुटुंबाने 1950 मधील खेडे सदृश्य युएईला पार बदलून टाकले. त्यांनी युएईच्या भाळी सुवर्ण भविष्याची नोंद केली. आज युएई जगातील अब्जाधीशांचा, पर्यटकांचा सर्वात आवडते डेस्टिनेशन आहे. अल सऊद कुटुंबाची एकूण संपत्ती 105 अब्ज डॉलर इतकी आहे.
फ्रासंचा लक्झरीयस फॅशन ब्रँड हर्मेस फॅशन हाऊस, हर्मेस कुटुंबियाची संपत्ती आहे. हा ब्रँड जगभरात मोठा लोकप्रिय आहे. श्रीमंतात या ब्रँडची खासा फॅशन आहे. फोर्ब्सच्या बिलिनिअर्स यादीत हे कुटुंब पाचव्या स्थानावर आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 94.6 अब्ज डॉलर इतकी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय या यादीत 6 व्या स्थानी आहे. अंबानी हे एकमेव कुटुंब या यादीत समाविष्ट आहे. या कुटुंबाकडे एकूण 84.6 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. फोर्ब्सने ही गर्भश्रीमंतांची यादी तयार केली आहे.