अंकिता लोखंडेला ‘या’ 7 चुका पडू शकतात भारी; हातातून निसटणार ‘बिग बॉस 17’ची ट्रॉफी?

अभिनेत्री अंकिता लोखंडेला सोशल मीडियावर विविध सेलिब्रिटींकडून खूप पाठिंबा मिळतोय. मात्र बिग बॉसच्या घरात तिची खेळीच तिला महाग पडू शकते. अंकिताकडून सतत होणाऱ्या चुकांमुळे ती ग्रँड फिनालेच्या आधीच बिग बॉसच्या घराबाहेर पडू शकते. या चुका कोणत्या, ते पाहुयात..

| Updated on: Jan 19, 2024 | 2:38 PM
'बिग बॉस 17'च्या पहिल्या दिवसापासून अभिनेत्री अंकिता लोखंडे तुफान चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील खेळीपेक्षा पती विकी जैनसोबत होणारी तिची भांडणं, यांमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय. ग्रँड फिनालेच्या आधी वोटिंग ट्रेंड्समध्येही अंकिताला मोठा झटका बसताना दिसतोय. बिग बॉसच्या घरातील कोणत्या चुकांमुळे अंकिता विजेतेपदाला मुकू शकते, ते पाहुयात..

1 / 8
अंकिताने बिग बॉसच्या घरात 13 आठवडे पूर्ण केले आहेत. मात्र इतक्या दिवसांत तिची कोणत्याही सदस्याशी चांगली मैत्री झाली नाही. ईशा मालवीय, अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारुकी यांच्यासोबत तिची सतत भांडणं होताना दिसतात.

2 / 8
अंकिताला बिग बॉसच्या खेळात पती विकी जैनकडूनच तगडी टक्कर मिळतेय. अंकितापेक्षा विकी उत्तम खेळतो, असं अनेकांचं मत आहे. प्रेक्षकांचा एक वर्ग विकीच्या बाजूने आहे. भांडणात अनेकदा अंकिताचीच चूक असते, असं त्यांचं म्हणणं आहे.

3 / 8
खऱ्या आयुष्यात पती-पत्नीचं नातं असूनही बिग बॉसच्या शोमध्ये अंकिता आणि विकीच्या नात्याची खरी परीक्षा घेतली जात आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना दोघांमधील गहिरं नातं किंवा रोमँटिक केमिस्ट्री अद्याप पहायला मिळाली नाही. शोमध्ये दोघं सतत भांडताना दिसत आहेत.

4 / 8
विकी जैनसोबतच्या भांडणांमध्ये अंकिताची नकारात्मक प्रतिमा दिसून आली. प्रत्येक भांडणाचं कारण म्हणजे अंकिताची असुरक्षितता आणि पझेसिव्हनेस ठरलं. त्यामुळे विकीला ती मोकळा श्वास घेऊ देत नसल्याची तक्रार काहींनी केली.

5 / 8
बिग बॉसच्या घरात स्वत:चं ठाम मत असणं फार महत्त्वाचं असतं. ते नसल्यास समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात अडकून स्पर्धक मोठी चूक करून बसतो. अंकिताच्या बाबतीत सध्या हेच घडतंय. कोणत्याच मुद्द्यावर अंकिताचं स्वत:चं ठाम मत कधीच दिसून आलं नाही. इतर स्पर्धकांचा तिच्यावर अधिक प्रभाव दिसून आला.

6 / 8
या खेळात अंकिता लोखंडेची कोणाशीच तगडी दुश्मनीसुद्धा दिसून आली नाही. भांडणानंतरही दुसऱ्या क्षणी ती त्या व्यक्तीशी मैत्री करते. त्यामुळे तिची खेळी प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण करतेय. अंकिता कोणाच्या बाजूने आहे आणि नाही तेच स्पष्ट होत नाही.

7 / 8
बिग बॉसच्या घरात अंकिताने अनेकदा सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला. सुशांतचा सतत उल्लेख करणं तिच्यावर भारी पडू शकतं. सुशांतच्या चाहत्यांनी ही गोष्ट पटली नाही. अनेकजण तिला ट्रोलसुद्धा करतायत. सहानुभूती मिळवण्यासाठी ती सुशांतचं नाव घेतेय, असंही काहीजण म्हणाले.

8 / 8
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.