काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील जबलपुरातील एका आंब्याच्या बागेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. या आंब्याच्या बागेच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. कारण या लक्झरी आंब्यांच्या एका किलोची किंमत अडीच लाख रुपये एवढी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? केवळ आंबाच नाही, तर अशी अनेक लक्झरी फळे आहेत, ज्यांची किंमत पाहून तुम्हीही आवाक व्हाल.
जापानच्या रुबी रोमन या द्राक्षाला त्याच्या आकार आणि चवीमुळे लक्झरी फळांच्या श्रेणीमध्ये टाकला गेला आहे. वास्तविक ही द्राक्षे पिंगपाँग बॉल जितकी मोठे आहेत आणि यातील प्रत्येक द्राक्षाचा आकार आणि टेक्शचर समान आहे. याशिवाय या द्राक्षांची चवही इतरांच्या तुलनेत जास्त गोड असते. ही द्राक्षे जापानच्या इशिकावा प्री फ्रेक्चरल यांच्या शेतात तयार झाली आहेत. काही वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या एका जपानी लिलावात यातील 24 द्राक्षे 8 लाख 17 हजारांना विकली गेली. म्हणजेच एका द्राक्षाची किंमत सुमारे 35 हजार रुपये होती.
जगातील सर्वात महागड्या फळांमध्ये गौतम बुद्धांच्या आकाराचे नाशपती देखील ओळखले जातात. बुद्ध नाशपातीची आयडिया सर्वात आधी एक चीनमधील एका शेतकऱ्यास आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा शेतकरी खास आकाराचा नाशपती पिकवत आहे. या एका नाशपातीची किंमत अंदाजे 700 रुपये आहे. तसेच बुद्धांच्या आकारामुळे बऱ्याच वेळा लोक या नाशपातीची हवी ती किंमत देखील देतात.
सेकाई इची हे सफरचंद जगातील सर्वात महाग आणि पौष्टिक सफरचंदांपैकी एक मानले जातात. ते 1974 मध्ये जपानच्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले. सेकाई ईची या म्हणजे जपानी भाषेत 'जगातील सर्वोत्कृष्ट' असा होतो. त्यामुळे हे या सफरचंदाबद्दल म्हटले जाते. विशेष म्हणजे हे सफरचंद मधाने धुतले जाते. या एका सफरचंदची किंमत सुमारे 1600 रुपये आहे.
कलिंगड हे फळ आकाराने लांब आणि आयताकृती असते. मात्र जपानमध्ये घन आणि चौरसाकृती कलिंगड पिकवले जाते. हे जगातील सर्वात महाग कलिंगड म्हणून ओळखले जाते. जपानमध्ये हे टरबूज चौरस लाकडी पेटीत उगवले जाते. त्यामुळे याला एक विशिष्ट आकार येतो. विशिष्ट आकार, चव यामुळे हे कलिंगड खूप महाग किंमतीत विकले जाते. या 5 किलो कलिंगडाची किंमत सुमारे 60 हजार रुपये इतकी आहे.
सेंबिकिया स्ट्रॉबेरी ही जगातील सर्वात महागड्या स्ट्रॉबेरींपैकी एक आहे. या स्ट्रॉबेरीचे नाव टोकियोमधील एका फळांच्या दुकानात ठेवण्यात आले आहे. 1834 मध्ये बांधलेल्या सांबिकिया शॉपची गणना जपानमधील सर्वात जुन्या फळांच्या दुकानांमध्ये केली जाते. ही स्ट्रॉबेरी चवीला अतिशय गोड असते आणि ती केवळ जपानमध्ये उपलब्ध आहेत. या 12 स्ट्रॉबेरीची किंमत सुमारे 85 डॉलर्स म्हणजेच 6 हजार रुपये आहे.