PHOTO | पर्यटनासाठी सर्वात धोकादायक असलेले 14 देश, ‘या’ देशांमध्ये अजिबात फिरायला जावू नका
अनेक लोकांना जगभर फिरण्याची, पर्यटनाची आवड असते. अनेकांचं संपूर्ण जग फिरण्याचं स्वप्न असतं. मात्र, आज आम्ही तुम्हाला त्या देशांविषयी माहिती देणार आहोत, ज्या देशांमध्ये पर्यटनाला जाणं धोकादायक ठरु शकतं. (Worlds most dangerous Countries)
Follow us
अनेक लोकांना जगभर फिरण्याची, पर्यटनाची आवड असते. अनेकांचं संपूर्ण जग फिरण्याचं स्वप्न असतं. मात्र, आज आम्ही तुम्हाला त्या देशांविषयी माहिती देणार आहोत, ज्या देशांमध्ये पर्यटनाला जाणं धोकादायक ठरु शकतं.
पर्यटनाबाबत माहिती देणाऱ्या travelriskmap.com या वेबसाईटने कोणत्या देशांमध्ये पर्यटनाला जाणं धोकादायक आहे याबाबत माहिती दिली आहे. travelriskmap.com ने जगातील 14 खतरनाक देशांची यादी जाहीर केली आहे. या देशांमध्ये दहशतवादी हल्ला, राजकीय अशांतता, युद्ध, सांप्रदायिक आणि जातीय हिंसा यांसारख्या घटना घडत असतात.
travelriskmap.com ने जाहीर केलेल्या लिस्टनुसार, अफगाणिस्तान, सीरिया आणि यमन हे देश सर्वात जास्त खतरनाक 14 देशांच्या यादीत आहेत.
या लिस्टमध्ये लिबिया, सोमालिया आणि माली या देशांचादेखील समावेश आहे. हे तीनही देश आतंकवाद, अंतर्गत वाद, राजकीय अस्थिरता सारख्या समस्यांनी धुमसत आहेत.
सर्वात खतरनाक देशांच्या यादीत दक्षिण आफ्रीकेतील काही भागांचादेखील समावेश आहे. यामध्ये दक्षिण सूडाण, ईराक सेंट्रल आफ्रीकन रिपब्लिक आणि नायजेरियाचा समावेश आहे.
या लिस्टमध्ये यूक्रेन, मिस्र, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो यांच्यासह पाकिस्तानचं देखील नाव आहे.