‘हे’ ज्येष्ठ अभिनेते साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका

'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट येत्या 26 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील साकारतोय. तर जरांगेच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री सुरभी हांडे आहे.

| Updated on: Mar 19, 2024 | 8:10 AM
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांनी ढवळून काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटातील मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेवरील पडदा उचलण्यात आला आहे.

1 / 6
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 26  एप्रिल रोजी  'संघर्षयोद्धा' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या  दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

2 / 6
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. याशिवाय चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

3 / 6
सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत. अगदी खलनायकी भूमिकांपासून चरित्र भूमिकांपर्यंतचं वैविध्य त्यांच्या अभिनयात आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका त्यांच्या आजवरच्या भूमिकांमध्ये एक लक्षणीय भूमिका ठरणार आहे.

4 / 6
स्वतःच्या मुलाचा संघर्ष, त्याची उपोषणं, राज्यभरातून मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा या काळात एका वडिलांची घालमेल मोहन जोशी यांच्या सशक्त अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

5 / 6
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका 'जय मल्हार' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडे साकारणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नीची जबाबदारी महत्त्वाची ठरली आहे. मनोज जरांगे पाटील समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत असताना घरच्या आघाडीवर त्यांची पत्नी लढत होती.

6 / 6
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.