Gold Reserve | आजघडीला जगातील पाच राष्ट्रांकडेच भारताहून अधिक सोन्याचा साठा आहे. 1991 साली रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ जपान आणि बँक ऑफ इंग्लंडकडे 49.61 सोने गहाण ठेवून 405 कोटी डॉलर्सचे कर्ज घेतले होते.
आगामी काळात हे एक्स्चेंज भारतातील सोन्याच्या आयातीचे मुख्य केंद्र ठरेल. भारतातील सोन्याची सर्व आयात याच International Bullion exchange मधून पार पडेल. हे एक्स्चेंज पूर्णपणए कार्यरत झाल्यानंतर सोन्याचे भाव योग्यरित्या ठरवले जातील, अशी आशा आहे.
Follow us
गेल्या 20 वर्षांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडील सोन्याच्या साठ्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकार फॉरेन एक्स्चेंज रिझर्व्ह म्हणून सोन्याचा साठा ठेवते. या साठ्याची देखरेख आणि सुरक्षेची जबाबदारी रिझर्व्ह बँकेकडे असते. संकटकाळात सुरक्षा आणि लिक्विडिटीसाठी सोन्याचा साठा बाळगला जातो.
स्वातंत्र्यानंतर सोन्याने आतापर्यंत एकूण 52000 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 1947 मध्ये सोन्याचे दर 88 रुपये प्रति तोळा होते. 1959 मध्ये पहिल्यांदा सोन्याचे दर 100 रुपये प्रति तोळाच्या पार गेले होते.
Sovereign Gold Bond
1974 मध्ये सोन्याचे दर 500 रुपयांच्या स्तरापलीकडे पोहोचले होते. तर 2007 मध्ये सोन्याचे दर 10000 रुपयांच्या जवळपास पोहोचले होते. सध्या सोन्याचा दर 48500 रुपये प्रतितोळा इतका आहे.
आजघडीला जगात अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि चीन या पाच देशांकडे भारतापेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे.
2014 ते 2020 या काळात रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा 33,880 कोटी डॉलर्सपर्यंत वाढला आहे.