Travel Special: तुम्हीही कॉफीप्रेमी आहात?; मग ‘या’ ठिकाणांना आवश्य भेट द्या
आजच्या काळात आपण अनेकदा लोकांच्या तोंडून ऐकतो की आम्ही चहा पीत नाही तर कॉफी पितो. कॉफी प्रेमींसाठी, एक कप कॉफी, मग ती जास्त गोड झालेली असो, डिकॅफिनयुक्त असो किंवा थंड असो, प्रत्येक प्रकारे प्रिय असते. मात्र, जास्त प्रमाणात कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र तुम्ही जर कॉफी प्रेमी असाल तर आज आम्ही तुम्हाला देशभरातील अशा काही कॉफींच्या मळ्यांबद्दल माहिती सांगणार आहोत, जिथे जाऊन तुम्ही मनसोक्त कॉफीचा आनंद घेऊ शकता.
1 / 6

2 / 6
अराकू: अराकू हा आंध्र प्रदेशातील कॉफींच्या मळ्यासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणात कॉफीचे उत्पन्न घेतले जाते. हा भाग अदिवासी बहुल आहे, येथील अदिवासी रोजीरोटीसाठी याच कॉफींच्या मळ्यावर अवलंबून असतात. तुम्हाला जर निसर्ग भ्रमंतीची आवड असेल तर तुम्ही एकदा आवश्य अराकूला भेट दिली पाहिजे. तसेच येथील जगप्रसिद्ध कॉफीचा देखील अस्वाद तुम्ही घेऊ शकता.
3 / 6
वायनाड : केरळमधील वायनाड हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. लोक अनेकदा येथे फिरायला येतात. वायनाड हे पर्यटकांसाठी अतिशय प्रिय असे ठिकाण आहे. येथील कॉफीचे मळे विशेष प्रसिद्ध आहेत. येथील कॉफीचे मळे पाहण्यासाठी दूरवरून लोक इथे येतात. तुम्ही सुद्धा वायनाडला गेल्यास येथील कॉफींच्या मळ्यांना आवश्य भेट द्या.
4 / 6
कूर्गला : कूर्गला कर्नाटकची शान म्हटले जाते, कूर्गचा संपूर्ण परिसर कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मळ्यांमध्ये अनेक चांगल्या प्रतीच्या कॉफीचे उत्पन्न घेतले जाते. तुम्ही जर येथे जाण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी नोव्हेंबर महिना सर्वोत्तम आहे. प्रत्येकाने एकदा तरी इथे जावे असे हे सुंदर असे ठिकाणा आहे.
5 / 6
चिकमंगळूर : चिकमंगळूर हे तेथील निर्सगासाठी प्रसिद्ध आहे. सोबतच चिकमंगळूरमध्ये अनेक कॉफीचे मळे देखील आहे. येथे पिकनाऱ्या कॉफीला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असते.
6 / 6
येरकौड : येरकौड हे तामिळनाडूमध्ये वसलेले आहे, याला दक्षिण भारताचे भूषण देखील म्हटले जाते, खरतर इथे कॉफीचे अनेक मळे आहेत, जर तुम्ही कधी इथे भेट द्यायला गेलात तर नक्कीच एकदा कॉफीच्या मळ्याचा आनंद घ्या. येथे मोठ्या प्रमाणात भारतीय प्रजातीच्या विविध कॉफींच्या प्रकारांची लागवड करण्यात येते.