कोरोनाच्या कालावधीत मुलं बराच काळ घरात होती, त्यामुळे त्यांना फोन, लॅपटॉप वापरण्याची खूप सवय लागली. या सवयीचा परिणाम अजूनही मुलांवर दिसून येत असून त्यामुळे मुलांची शारीरिक हालचाल अतिशय कमी झाली आहे. त्यामुळे मुलांसोबत रोज खेळा, त्यांना व्यायामाची गोडी लावण्याचा प्रयत्न करा.