PHOTO | दलजित कौर ते श्वेता तिवारी, ‘या’ अभिनेत्री ठरल्या होत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी
सेलिब्रिटींचे जीवन बाहेरून दिसते तितके साधे नाही. कल्पनारम्य लग्न, परिपूर्ण प्रेमकथा पाहून केवळ आनंदी शेवटाचा विचार करताना प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही. अलीकडेच अभिनेत्री निशा रावल हिने पती करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. दोघांचेही विवाहित जीवन संपण्याच्या मार्गावर आहे.
1 / 9
सेलिब्रिटींचे जीवन बाहेरून दिसते तितके साधे नाही. कल्पनारम्य लग्न, परिपूर्ण प्रेमकथा पाहून केवळ आनंदी शेवटाचा विचार करताना प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही. अलीकडेच अभिनेत्री निशा रावल हिने पती करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. दोघांचेही विवाहित जीवन संपण्याच्या मार्गावर आहे. निशाने करणविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, असं करणारी ही पहिली टीव्ही अभिनेत्री नाही, इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी पतींवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे.
2 / 9
टीव्ही अभिनेत्री दलजित कौर यांनीही पती शालीनवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. 2009मध्ये दलजितने आपला को-स्टार शालीन भनोत याच्याशी लग्न केले. 2015 मध्ये दलजितने शालीनसोबत घटस्फोट घेतला, त्याचे कारण घरगुती हिंसाचार होते. दोघांचा एक मुलगा असून तो सध्या आई दलजितसोबत राहतो.
3 / 9
'कसौटी जिंदगी की' फेम श्वेता तिवारीचे दोन विवाह झाले. पण दोन्हीही अयशस्वी ठरली. श्वेताचे पहिले लग्न राजा चौधरी यांच्याशी झाले होते. या लग्नापासून तिला एक मुलगी ‘पलक’ आहे. राजाशी तिचे फारकाळ लग्न टिकले नाही. 2007 मध्ये तिने राजाविरूद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. अभिनव कोहलीपासून तिला एक मुलगा ‘रेयांश’ आहे. श्वेताने अभिनववर देखील घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. अभिनवबरोबरचे तिचे वाद सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहे.
4 / 9
बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमीने गौरव गुप्ताशी लग्न केले होते. काही काळ डेटिंगनंतर दोघांनी 2017 मध्ये लग्न केले होते. तथापि, हे लग्न फारकाळ टिकले नाही. मंदानाने गौरववर अनेक आरोप केले होते. गौरवच्या आईने आपला छळ केल्याचा आरोपही मंदानाने केला होता. ते आपल्याला जबरदस्तीने हिंदू बनवू इच्छित असल्याचे देखील तिने म्हटले होते. मंदानाने तिच्या सासरच्या लोकांविरूद्धही गुन्हा दाखल केला होता.
5 / 9
अभिनेत्री रश्मी देसाई हिचे लग्न अभिनेते नंदिश संधू यांच्याशी 2012 मध्ये झाले होते. त्यांचे हे नाते पाच वर्षे टिकले. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. अशी बातमी होती की, नंदीश तिला मारहाण करत असे.
6 / 9
अभिनेत्री रुचा गुजराती हिने तिचा अभियंता प्रियकर मितुल संघवी याच्याशी 2010मध्ये लग्न केले होते. तिच्या सासरच्यांनी तिच्यावर आणि तिच्या वडिलांवर हात उगाराल्याची तक्रार रुचाने पोलिसांत दिली होती.
7 / 9
अभिनेत्री दीपशिखा नागपालने 2012 मध्ये पती केशव अरोराशी लग्न केले होते. त्यानंतर काहीच वेळात तिने घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. तसेच केशवने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही तिने सांगितले.
8 / 9
अभिनेत्री वाहबिज दोरबजीने अभिनेता व्हिव्हियन डीसेनाशी लग्न केले होते. मात्र, काही काळानंतर दोघांचा घटस्फोट चर्चेत आला होता. अशी बातमी होती की, वाहबिजने व्हिव्हियनवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.
9 / 9
राहुल महाजनसोबत टीव्हीवर एका शोमध्ये डिंपी गांगुलीचे लग्न झाले होते. पण त्यांच्या लग्नात काही काळानंतर समस्या येऊ लागल्या. तिने राहुलवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला.