Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, द्राक्ष बागा जमीनदोस्त, आंब्यांनाही फटका

Unseasonal Rain: राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष बाना उन्मळून पडल्या आहेत. सांगली, मिरज, सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

| Updated on: Mar 26, 2025 | 1:51 PM
सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हा द्राक्षबाग शेतीला बसलेला आहे. जत तालुक्यामध्ये वादळ वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबाग शेतीचा मोठा नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा जमीनदोस्त झाले आहेत.

1 / 6
जतमध्ये काही ठिकाणी तयार झालेले द्राक्ष घडांसह कोसळले आहेत. हाता तोंडाशी आलेल्या द्राक्षबागा जमीनदस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडून तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

2 / 6
मिरज, सांगली शहरांस अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मिरज शहरामध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे मिरज शहरांमध्ये काही वेळातच अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यानंतर सांगली शहराला देखील अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

3 / 6
प्रचंड वादळी वाऱ्यासह सांगली शहरामध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार अवकाळी पाऊस पडला आहे. वादळी वाऱ्यामुळे बेदाणा शेडवरील ताडपत्री तरच अनेक ठिकाणी घरांची पत्रे देखील उडून गेलेले आहेत. वादळी वारा व पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.

4 / 6
सोलापूर जिल्ह्यातीला शेतीला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरासमधील टरबूज बाग मातीमोल झाली. एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवासेंदिवस चाळीशीच्या पलीकडे जात असल्याने फळपिकांना तग धरणे कठीण झाले असताना हे संकट आले आहे.

5 / 6
बार्शी तालुक्यातील राळेरासमधील शेतकरी मोतीबुवा गोसावी यांचे एक एकर टरबूजाचे नुकसान झाले आहे. इतर अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.