उर्वशी रौतेलाच नाव नसीम शाह बरोबर जोडलं जातय. आशिया कप स्पर्धा पाहण्यासाठी उर्वशी दुबईला गेली होती. त्याचवेळी एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आपल्याला याबद्दल कल्पना नाही, असा दोघांचा दावा आहे.
पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहने एवढ सुद्धा म्हटलं की, उर्वशी रौतेलाला मी ओळखत नाही. ती कोण आहे, हे मला माहित नाही. उर्वशीने सांगितलं की, एडिटेड व्हिडिओ तिच्या टीमने शेयर केला होता. व्हिडिओमध्ये कोण आहे त्या बद्दल मला काहीच कल्पना नव्हती.
आता सोशल मीडियावर उर्वशीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. नसीम शाहच्या उत्तरानंतर तिने हे पाऊल उचलल्याच बोललं जातय.
क्रिकेट पाकिस्तान आणि युजर्सनी उर्वशीच्या अकाऊंटचा स्क्रीनशॉट शेयर केलाय. यात दिसतय की, ती आधी नसीमला इनस्टाग्रामवर फॉलो करायची.
उर्वशीला ओळखत नाही, असा पाकिस्तानी गोलंदाजाने दावा करताच अभिनेत्रीने त्याला अनफॉलो केलं.