लोकप्रिय मालिकांमधील वटपौर्णिमा विशेष भागात रंजक ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवर रात्री 8 वाजता 'तुला शिकवीन चांगलाच धडा', रात्री 9 वाजता 'शिवा', संध्याकाळी 7.30 वाजता 'पारू', रात्री 10 वाजता 'नवरी मिळे हिटलरला' आणि रात्री 9.30 वाजता 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांचा 'वटपौणिमा विशेष भाग' पहायला मिळणार आहे.

| Updated on: Jun 20, 2024 | 12:02 PM
वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून, उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा वटपौर्णिमा प्रेक्षकांच्या लोकप्रिय मालिकांमध्येही साजरा होणार आहे.

1 / 6
'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. दोघंही घर सोडून नवीन संसार सुरू करण्याच्या उंबरठयावर आहेत. अक्षराने वट सावित्रीचा उपवास केला आहे. अक्षराला इतके कष्ट घेताना बघून अधिपतीदेखील पूजेमध्ये तिच्यासोबत आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने या दोघांवर एक विशेष गाणंदेखील चित्रित झालं आहे.

2 / 6
'नवरी मिळे हिटलरला'मध्ये दुर्गा, कालिंदीसमोर जहागीरदार घराण्याच्या एका अशा प्रथेचा उल्लेख करते ज्यामध्ये जर नव्या नवरीने वडाच्या झाडाला 1001 फेऱ्या मारल्या तर संसार सुखाचा होतो. कालिंदीच्या मनात ती गोष्ट घर करून आहे आणि ती लीलाकडून 1001 फेऱ्या मारून घेण्याचा निश्चय करते. फेऱ्या मारताना लीलाची तब्बेत बिघडते. आता अभिराम यात लीलाला कशी साथ देतो हे पाहणं रंजक असणार आहे.

3 / 6
'पारू' मालिकेत अहिल्यादेवी वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांसाठी जेवण बनवायचं ठरवते. तर दुसरीकडे कोणाच्याही नकळत पारू वडाच्या झाडाची पूजा करायचं ठरवते. वटपौर्णिमेच्या दिवशी पारू आदित्यच्या ताटातलं उष्ट जेवण जेवते. हे सगळं सावित्री पाहते. पारूचं सत्य सावित्रीसमोर येईल का हे मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल.

4 / 6
'शिवा'च्या पहिल्या वट सावित्रीसाठी रामभाऊ आणि संपूर्ण परिवार पूजेसाठी जातात. शिवा आपल्या पूजेची सुरूवात करत असताना काही गुंड आशूच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. आशु त्यांच्याशी दोन हात करायला जातो. पण यात आशूवर वार होतो.  तिकडे  शिवा आशूच्या मदतीला येते. वट सावित्रीच्या दिवशी ही सावित्री आपल्या सत्यवानची रक्षा या गुंडांपासून कशी करणार हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

5 / 6
'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये वसुंधरा आपल्या जुन्या नात्यांच्या धाग्यांना तोडून आकाशसोबत एक नवीन विश्व उभारण्याचा निर्णय घेईल का हे या वटपौर्णिमा विशेष भागात मिळणार आहे. हा मोठा निर्णय घेत असताना वसुंधराचा भूतकाळ तिच्यासमोर येऊन उभा राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

6 / 6
Follow us
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.