पहिल्या पतीने फसवलं, प्रियकराने अभिनेत्रीला वेश्या व्यवसायात ढकललं; प्रचंड संघर्षमय होतं तिचं आयुष्य
मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना आयुष्यात कायम संघर्षाचाच सामना करावा लागला. काही अभिनेत्रींना पतीने फसवलं तर, काही अभिनेत्रींसोबत प्रियकराने गैरवर्तन केलं. आज काही गोष्टींना अनेक वर्षा झाली असली तरी, झालेल्या घटना कायम चर्चेत राहतात. बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जिला पतीनंतर प्रियकराने फसवलं आणि व्यवसायात ढकललं...
1 / 6
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री विमी (Vimi Life Story) यांनी फार कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्रीचं करियर फार उत्तम होतं, पण तितकंच वाईट अभिनेत्रीचं खासगी आयुष्य होतं. विमी यांनी मोठ्या पडद्यावर अनेक नवीन विक्रम रचले. पण अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ - उतार आले. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापू्र्वी विमी यांनी उद्योजक शिव अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. विमी आणि शिव यांना दोन मुलं देखील होती.
2 / 6
दोन मुलांची आई असताना देखील त्या काळात विमी यांना चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. विमी यांनी फार कमी वेळात यशाचं उच्च शिखर गाठलं. राज कुमार यांच्यापासून ते सुनील दत्त यांच्यासोबत अनेक अभिनेत्यांना विमी यांच्यासोबत काम करायचं होतं.
3 / 6
विमी यांनी ‘हमराज’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमासाठी विमी यांनी तब्बल ३ लाख रुपये मानधन स्वीकारलं होतं. त्या काळी तीन लाख म्हणजे फार मोठी रक्कम होती. पण यश मिळवल्यानंतर आणि लग्नाच्या अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक बदल झाले. अखेर अभिनेत्री पतीपासून विभक्त झाली.
4 / 6
पतीपासून विभक्त झाल्यानंतर विमी यांच्या आयुष्यात खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. पतीपासून विभक्त झाल्यानंतर विमी यांच्या आयुष्यात नव्या प्रेमेची एन्ट्री झाली. पण दुसऱ्या प्रेमाने आभिनेत्रीला अनेक दुःख आणि संकटं दिली.
5 / 6
ज्या व्यक्तीवर विमी यांना दुसऱ्यांदा प्रेम झालं होतं, ती व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली होती. ज्यामुळे विमी यांच्या प्रियकराने त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं. त्यानंतर अनेक वर्ष आयुष्यात संघर्षाचा सामना केला.
6 / 6
अखेर वयाच्या ३४ व्या वर्षी अभिनेत्रीची प्रकृती खालावली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान विमी यांचं निधन झालं. शेवटच्या क्षणी मात्र अभिनेत्री विमी यांच्यासोबत कोणीही नव्हतं.