Photo Gallery : ‘ते’ दोन तास अन् शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चकणाचूर, कांदा नगरीत झालं तरी काय?
लासलगाव : कांद्याचे दर जसे लहरी असतात त्याहून कित्येक पटीने यंदा निसर्गाने त्याचा लहरीपणा दाखवलेला आहे. आता कुठे सर्वकाही स्थिर स्थावर होत होते. गेल्या महिन्याभरापासून अवकाळीचे संकट दूर झाल्याने बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागला होता. द्राक्ष बागा अंतिम टप्प्यात तर उन्हाळी हंगामासह खरिपातील कांदा काढणीची कामे जोमात सुरु होती. असे असतानाच पुन्हा निसर्गाने अवकृपा दाखवलेली आहे. कांद्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगावात अवकाळी पाऊसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीपिकांचे तर नुकसान झाले आहे पण सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसलेला आहे. दरवर्षी दरातील चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे उत्पादन पदरी पडण्यापूर्वीच बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.
Most Read Stories