कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगड आणि काकडीचा रस लागणार आहे. ते दोन्ही रस व्यवस्थितपणे एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा.
दूध आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये 2 चमचे किसलेले कलिंगड मिक्स करा. 25 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
लिंबू आणि कलिंगडचा फेसपॅक करण्यासाठी लिंबाचा रस आणि कलिंगड मिक्स करून घ्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपला चेहरा हायड्रेट राहतो.
केळी आणि कलिंगडचा फेस मास्क आपण घरी तयार करू शकतो. यासाठी केळीचे तुकडे आणि किसलेले कलिंगड घ्या. हा फेसपॅक 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर कोमट पाण्याने धुवा.
दही आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे दही आणि कलिंगडचा रस मिक्स करा आणि 10 ते 15 मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.