PF Account | करदार व्यक्तींच्या पगारातील ठराविक रक्कम दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीत (PF) जमा होत असते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या उतारवयासाठीची पुंजी मानली जाते. सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO नोकरदारांना अडचणीच्या काळात वापरण्यासाठी पीएफची काही रक्कम आगाऊ काढण्याची सुविधा देऊ केली आहे. मात्र, अडचणीच्यावेळी घाईघाईत PF चे पैसे काढताना काही चुका झाल्यास त्या निस्तरणे अवघड होऊन बसते.
पीएफ अकाऊंट
Follow us
PF Interest Rate
अनेकदा पीएफ खातेधारकाने केवायसीची पूर्तता केलेली नसते. त्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. याशिवाय, तुमचा केवायसी तपशील योग्य असणे गरजेचे आहे. तुम्ही EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन या गोष्टी योग्य आहेत किंवा नाही, हे तपासू शकता.
तुमच्या कागदपत्रांवरील जन्मतारीख आणि ईपीएफओच्या रेकॉर्डसमधील जन्मतारीख वेगवेगळी असेल तरी तुमचा पैसे काढण्यासाठीचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
EPFO ने UAN नंबर आधार कार्डाशी लिंक करणे सक्तीचे केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. यासाठीची सगळी नियमावली EPFOकडून जाहीर करण्यात आली आहे.
तुम्ही फॉर्म भरताना चुकीचा बँक अकाऊंट नंबर टाकला असेल तर पैसे काढताना मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरा. अन्यथा तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो.