
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी अनंत आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी प्री-वेडिंग फंक्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रूझवर चार दिवस ही पार्टी होणार असून त्यात जगभरातून निवडक सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत.

जागतिक ख्यातीचे पॉप-रॉकस्टार्स अंबानींच्या प्री-वेडिंगला परफॉर्म करत आहेत. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये मानधन घेतलं आहे. या प्रायव्हेट लाइव्ह प्रोग्रॅमसाठी अंबानींकडून अमाप पैसा खर्च केला जातोय.

कोलंबियन गायिका शकिराचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. एका कार्यक्रमासाठी ती कोट्यवधी रुपये मानधन घेते. अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये खास परफॉर्म करण्यासाठी तिने 15 कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय.

प्रसिद्ध अमेरिकन गायिका केटी पेरीसुद्धा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करणार आहे. केटी पेरी ही सर्वांत महागडी स्टार असून तिने या कार्यक्रमासाठी तब्बल 45 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

जगप्रसिद्ध अमेरिकन व्होकल ग्रुप 'बॅकस्ट्रीट बॉइज'ने अंबानींच्या कार्यक्रमासाठी 5 ते 7 कोटी रुपये फी घेतल्याचं कळतंय. या ग्रुपमध्ये निक कार्टर, होवही डोरो, एजे मॅकलीन, ब्रायन लिटरेल आणि केव्हीन रिचर्डसन यांचा समावेश आहे.

मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगरमध्ये तीन दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. तेव्हासुद्धा काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी परफॉर्म करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी रिहानाने तब्बल 74 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं गेलं होतं.

या कार्यक्रमात प्रसिद्ध पंजाबी आणि बॉलिवूड गायक दिलजित दोसांझनेही परफॉर्म केलं होतं. त्यासाठी त्याला 4 कोटी रुपये मिळाले होते. दिलजितची क्रेझ संपूर्ण बॉलिवूड कलाकारांमध्ये पहायला मिळते.

याआधी इशा अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अमेरिकन गायिका बियोन्सेनं परफॉर्म केलं होतं. 2019 मध्ये हा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी तिने तब्बल 33 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.

तर आकाश अंबानींच्या लग्नात जगप्रसिद्ध 'कोल्डप्ले' बँडचा ख्रिस मार्टिन याने परफॉर्म केलं होतं. त्यासाठी त्याला 8 कोटी रुपये मानधन मिळालं होतं. कोल्डप्ले हा बँड जगभरात तुफान लोकप्रिय आहे.