कोण आहे पी. व्ही. सिंधूचा होणारा पती? IPL टीमसोबत केलंय काम

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिचा होणारा पती कोण आहे, याविषयी नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पी. व्ही. सिंधूच्या होणाऱ्या पतीचं नाव वेंकट दत्ता साई असं आहे.

| Updated on: Dec 03, 2024 | 11:11 AM
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. वेंकट दत्ता साई असं तिच्या होणाऱ्या पतीचं नाव असून उदयपूरमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. येत्या 20 डिसेंबरला लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल आणि त्यानंतर 24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये शाही रिसेप्शनचं आयोजन करण्यात येईल.

1 / 7
पी. व्ही. सिंधू जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बॅटमिंटन सर्किटमध्ये भाग घेऊ शकेल हे लक्षात ठेवून लग्नाची तारीख ठरवण्यात आली आहे. कारण यापुढील सिझन हे सिंधूसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. सिंधूच्या लग्नाची घोषणा होताच तिचा होणारा पती कोण, हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

2 / 7
सिंधूचा होणारा पती वेंकट दत्ता साई हा हैदराबादस्थित पॉसाइडेक्स टेक्नॉलॉजीजमध्ये कार्यकारी संचालक या पदावर आहे. तो प्रतिभावान व्यावसायिक आणि अनुभवी उद्योजकसुद्धा आहे. वेंकट दत्ता साईने वित्त, डेटा सायन्स आणि मालमत्ता व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

3 / 7
दत्ता साईने 'फाऊंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन'मधून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये डिप्लोमाची पदवी संपादित केली. नंतर 2018 मध्ये पदवीधर होऊन त्याने फ्लेम युनिव्हर्सिटीमधून अकाऊंटिंग आणि फायनान्समध्ये बीबीए केलं.

4 / 7
पी. व्ही. सिंधूच्या होणाऱ्या पतीने बेंगळुरूच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

5 / 7
दत्ता साईने JSW मध्ये इंटर्न आणि इन-हाऊस सल्लागार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्याच कार्यकाळात त्याने JSW च्या मालकीच्या दिल्ली कॅपिटल्सचं व्यवस्थापन केलं होतं. दत्ता साईने LinkedIn या सोशल मीडिया अॅपवर आपल्या अनुभवाविषयी लिहिलंय, 'आयपीएल संघाचं व्यवस्थापन करण्याच्या तुलनेत माझं वित्त आणि अर्थशास्त्रातील बीबीएचं शिक्षण फिकं पडतं. परंतु या दोन्ही अनुभवांमधून मी बरंच काही शिकलोय.'

6 / 7
2019 मध्ये दत्ता साईने दुहेरी नेतृत्त्वाची भूमिका स्वीकारली. Sour Apple मालमत्ता व्यवस्थापनमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि Posidex Technologies मध्ये कार्यकारी संचालक या पदांवर तो काम करत होता. सध्याच्या घडीला तो  Posidex Technologies मध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करतोय.

7 / 7
Follow us
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.