नववर्षाला फ्रान्समध्ये का जाळल्या गेल्या 874 गाड्या,या विवादास्पद परंपरा मागील काय आहे नेमके कारण ?
प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही नववर्षाच्या आरंभी फ्रान्समध्ये मोठ्या संख्येत वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या परंपरेची सुरुवात अंदाजे तीन दशकापूर्वी झाली होती. वेळेनुसार या परंपरामुळे अनेक वादांचा जन्म सुद्धा झाला. जाणून घेऊया का झाली होती या परंपराची सुरुवात....
1 / 5
प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही नववर्षाच्या आरंभी फ्रान्समध्ये मोठ्या संख्येत वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या परंपरेची सुरुवात अंदाजे तीन दशकापूर्वी झाली होती. वेळेनुसार या परंपरामुळे अनेक वादांना जन्म सुद्धा झाला. पोलिसांचे असे म्हणणे आहे की या परंपरेमुळे लोक त्यांच्याद्वारे केलें गेलेल्या अपराधी कृत्यांना लपविण्याचा प्रयत्न करतात.अनेक जण खराब झालेल्या वाहनांचा विमा पैसे मिळविण्यासाठी सुद्धा अश्या प्रकारचे कृत्य करतात.काय आहे कार जाळण्याची परंपरा ,याची सुरुवात कशी झाली? आणि ही परंपरा का पुढे ही चालूच राहिली.. जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरे (PS-WION)
2 / 5
कार वाहनांना जाळण्याची पद्धत 1990च्या दशकात स्ट्रॉसबर्ग येथून सुरुवात झाली.याची सुरुवात आर्थिक तंगीने ग्रस्त असणाऱ्या तरुणांनी केली होती. ही परंपरा विरोध करण्याचे एक प्रतीक होते परंतु कालांतराने हे एक विवादाचे कारण बनले गेले. 2005 मध्ये निवासी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी 9 हजार वाहनांना जाळण्यात आले होते,अश्या प्रकारे पुढे ही एक परंपरा सुरूच राहिली. (PS-NEWSWEEK)
3 / 5
हळूहळू विरोधाचे असलेले प्रतीक न्यू इयर सेलिब्रेशनचा एक हिस्सा झाला. यावर्षी नववर्षाच्या मुहूर्तावर फ्रान्समध्ये एकूण 874 गाड्यांना आगीच्या हवाले करण्यात आले. खरेतर वर्ष 2019 च्या तुलनेत यांच्या संख्येत घट होती.2019 मध्ये येथे 1316 कार जाळण्यात आल्या होत्या.गाडी जाळण्याच्या कारणावरून पोलिसांनी 441 स्थानिक लोकांची चौकशी देखील केली होती. (PS-CNN)
4 / 5
मीडिया रिपोर्ट अनुसार, कार जाळण्याची परंपरा विरोध करण्याचे एक प्रतीक म्हणून सुरुवात करण्यात आली होती परंतु सध्या याला अनेक गोष्टींशी जोडले जात आहे. काही लोक विमाराशीचे पैसे प्राप्त करण्यासाठी कार मुद्दाम आगीच्या हवाले करतात. काही तरुण बदला घेण्यासाठी दुसऱ्यांच्या कार जाळतात तसेच रिपोर्टमध्ये असे सुद्धा सांगण्यात आले आहे की,काही लोक क्राईम केल्यानंतर पुरावा लपवण्यासाठी सुद्धा असे कृत्य करतात म्हणून या प्रथेला आळा घालता येत नाहीये. (PS-BBC)
5 / 5
येथील अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की,या परंपरा दरम्यान चार पोलिस अधिकारी जखमी देखील झाले.गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यंदा कार जाळण्याच्या संख्येत घट झाली आहे याचे कारण कोरोना महामारी आहे. (PS-ALBAWABA))