Chhatrapati Sambhaji: ज्या शाळेने घडवले त्या शाळेच्या साक्षीने कार्यकाळाची सायंकाळ व्यतीत केली, छत्रपती संभाजीची भावनिक पोस्ट
जून 2016 मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून माझी नियुक्ती झाली, तेव्हा पहिल्याच दिवशी दुर्गराज रायगडावर श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस्थळास अभिवादन करून मी माझ्या खासदारकीची सुरूवात केली होती. 03 मे 2022 रोजी माझा या खासदारकीचा कार्यकाळ समाप्त झाला. हा दिवस मी राजकुमार कॉलेज, राजकोट येथे व्यतीत केला.
![छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांची पुण्याई माझ्या पाठीशी आहे. ज्या रायगडाने मला मोठे केले त्या रायगडच्या साक्षीने मी माझ्या खासदारकीची पहिली पहाट सुरू केली आणि ज्या शाळेने मला घडवले त्या शाळेच्या साक्षीने या कार्यकाळाची सायंकाळ व्यतीत केली आणि उद्याच्या नव्या सूर्योदयासोबत तेजाळण्याची उर्मी घेऊन येथून बाहेर पडलो असे म्हणत माजी खासदार छत्रपती संभाजी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे .](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/05165927/chatrapati-sanbhaji-6.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 8
![जून 2016 मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून माझी नियुक्ती झाली, तेव्हा पहिल्याच दिवशी दुर्गराज रायगडावर श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस्थळास अभिवादन करून मी माझ्या खासदारकीची सुरूवात केली होती. 03 मे 2022 रोजी माझा या खासदारकीचा कार्यकाळ समाप्त झाला. हा दिवस मी राजकुमार कॉलेज, राजकोट येथे व्यतीत केला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/05165930/chatrapati-sanbhaji-5.jpg)
2 / 8
![गुजरातमधील राजकोट येथे असणाऱ्या सुमारे 150 वर्षे जुन्या ऐतिहासिक राजकुमार कॉलेज मध्येच राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे शिक्षण झाले होते. महाराजांचे वडील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज देखील काही काळ या शाळेत शिकले होते. 1978 ते 1983 या काळात माझे शिक्षण याच शाळेमध्ये झाले. या शाळेशी माझ्या बालपणातील अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/05165938/chatrapati-sanbhaji-3.jpg)
3 / 8
![यानिमित्ताने जवळपास 40 वर्षांनंतर मी माझ्या शाळेला पुन्हा भेट दिली. यावेळी बालपणातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. शाळेचा संपूर्ण परिसर फिरून बालपण पुन्हा जगलो. ज्या डॉर्मेटरी मध्ये राहायचो तिथे गेलो, मेस मध्ये गेलो, मैदानावर गेलो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/05165935/chatrapati-sanbhaji-4.jpg)
4 / 8
![राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त कॉलेज मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मला निमंत्रित केले होते. यावेळी उपस्थित राहून महाराजांच्या या शाळेत महाराजांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली वाहिली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/05165942/chatrapati-sanbhaji-2.jpg)
5 / 8
![शाळेत एक परंपरा होती की, प्रतिवर्षी ३० गुणवंत विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी प्रिन्सिपॉल बंगल्यात राहायला मिळायचे. १९८२-८३ या वर्षात मला ही संधी मिळाली होती. आज ४० वर्षानंतर परत याच ठिकाणी कॉलेज प्रशासनाने माझी उतरण्याची व्यवस्था केली होती, यामुळे परत त्या काळात गेल्याची अनुभूती झाली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/05170611/chatrapati-sanbhaji-7.jpg)
6 / 8
![कॉलेजच्या व्यवस्थापकीय मंडळावर असलेले माझे वर्गमित्र युवराज साहेब रणजितसिंह परमार हेदेखील यावेळी सोबत होते. त्यांच्यासह कॉलेजमध्ये सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आमच्या जुन्या आठवणी सांगितल्या... त्यांनीही सगळ्याचा मनस्वी आनंद घेतला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/05165945/chatrapati-sanbhaji-1.jpg)
7 / 8
![१९७८ ते १९८३ या काळात माझे शिक्षण याच शाळेमध्ये झाले. या शाळेशी माझ्या बालपणातील अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/05170614/chatrapati-sanbhaji.jpg)
8 / 8
![त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ? त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayurvedic-powder-for-health-1.jpg?w=670&ar=16:9)
त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?
![मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं? मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/is-it-bad-luck-to-keep-ashes-in-the-house-hindu.jpg?w=670&ar=16:9)
मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-treasure-pics-1024x682-1.jpg?w=670&ar=16:9)
जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू
![कोंबडी दिवसाला किती अंडी देते? कोंबडी दिवसाला किती अंडी देते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/a-hen-lay-in-one-day.jpg?w=670&ar=16:9)
कोंबडी दिवसाला किती अंडी देते?
![चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chinese-currency-cny.jpg?w=670&ar=16:9)
चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या