मुंगी आपल्या आजूबाजूला कायमच आढळतं. लाल मुंग्या काळ्या मुंग्या असे काही सर्वसामान्य प्रकार सर्वांनाच माहिती आहेत. याशिवायही त्यांच्या अनेक प्रजाती आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की जगात अशीही एक मुंगी आहे जिच्या चाव्यानं माणसाचा जीवही जाऊ शकतो.
या मुंगीचं नाव Bulldog Ant असं आहे. या मुंग्या ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर आढळतात. या मुंग्या शिकारीसाठी शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर पडतात.
माणसाला किंवा प्राण्यांना चावताना ही मुंगी डंख मारून चावा घेते. याचवेळी ती आपल्या शरीरातील विष माणसाच्या शरीरात सोडते. हे विष इतकं विषारी आहे की त्यामुळे जीवही जाऊ शकतो. म्हणूनच या मुंगीला जगातील सर्वात धोकादायक मुंगी म्हटलं जातं. बुलडॉग नावाची ही मुंगी आकाराने 1 इंचपेक्षाही लहान आहे.
या मुंग्यांना अनेक नावांनी ओळखलं जातं. लॉयन अँटशिवाय, जॅक जंपर अँट्स अशीही त्यांची ओळख आहे. इतर मुंग्यांच्या तुलनेत बुलडॉग मुंग्याचं जीवनमानही जास्त असतं.
या मुंग्यांना राणी मुंगीची गरज लागतेच असं नाही. या मुंग्या राणी मुंगीशिवायही अंडी देतात. त्यामुळे त्यांची संख्या विनाविलंब वाढत राहते.