व्हेगन डाएट हा असा एक ट्रेंड आहे ज्यामध्ये प्लांट-बेस्ड म्हणजेच वनस्पतीजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी जागतिक व्हेगन डे साजरा केला जातो.
मधाऐवजी गुळाचा वापर - तुम्हालाही व्हेगन डाएट फॉलो करायचे असेल तर तुम्हाला काही पदार्थांसाठी इतर पर्यायांचा वापर करावा लागेल. तुम्ही साखर किंवा मधाऐवजी गुळाचा वापर करू शकता. त्यामध्ये अनेक पोषक तत्वं असतात.
व्हेगन डाएटवाल्यांना नेहमी असा प्रश्न पडतो की मांसाहारी पदार्थांची चव व त्याचे गुणधर्म कसे मिळणार. तुम्ही मांस सेवन करण्याऐवजी मशरूम्स खाऊन त्याची कमतरता पूर्ण करू शकता.
आपल्याला लहानपणापासूनच दूध पिण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामध्ये कॅल्शिअम असते. व्हेगन डाएटचे पालन करणाऱ्या व्यक्ती नारळाचे तसेच काजू वा बदामाचे दूध पिऊ शकतात.
पनीर हे दुधापासून तयार केले जाते व ते आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते. तुम्ही व्हेगन डाएटचे पालन करताना पनीरसाठी पर्याय म्हणून टोफूचे सेवन करू शकता. तो एक उत्तम पर्याय ठरेल