चांगल्या व निरोगी आयुष्यासाठी फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. फळांमध्ये व्हिटॅमिन्स व मिनरल्स यांसारखी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. फळांचे सेवन केल्याने आपला अनेक आजारांपासून बचाव तर होतोच त्याशिवाय फळे आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. कोणकोणत्या फळांचा डाएटमध्ये आवर्जून समावेश केला पाहिजे, हे जाणून घेऊया.