PHOTO | मावळता सूर्य, समुद्रकिनारा आणि ‘ती’, क्रिकेटपटू चहलचा रोमँटिक अंदाज
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे (Yuzvendra Chahal share romantic photo with girlfriend).
Follow us
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येत्या 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये तो खेळताना दिसणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात चहलला सध्या त्याची होणारी पत्नी धनश्री वर्माची आठवण सतावत आहे.
चहलने इन्स्टाग्रामवर धनश्रीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील वातावरण अत्यंत रोमँटिक वाटत आहे. फोटोतील वेळ संध्याकाळची आहे. सूर्य मावळताना दिसत आहे. विशेष म्हणजे चहल आणि धनश्री दोघं समुद्र किनाऱ्यावर आहेत. त्यांचे एकमेकांच्या हातात हात आहे. पण दोघांमध्ये मावळणारा सूर्य तितक्याच गडदपणे फोटोत दिसत आहे. त्यामुळे या फोटोत संध्याकाळचं वातावरण प्रचंड रोमँटिक दिसत आहे.
चहलने या फोटोसोबत धनश्रीला उद्देशून एक वाक्य म्हटलं आहे. “मी तुझ्यासोबत चालत राहणार आणि शेवटच्या घटकापर्यंत सोबत राहणार”, असं चहल म्हणाला आहे.
काही दिवसांपूर्वी दुबईत आयपीएल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेदरम्यान धनश्री देखील चहलसोबत दुबईत होती. आयपीएल संपल्यानंतर चहल ऑस्ट्रेलियात गेला तर धनश्री भारतात परत आली.
चहलने धनश्रीसोबत याआधी देखील बऱ्याचदा रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधून दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, विश्वास अधोरेखीत होतो. त्यांचे फोटो पाहून कित्येक चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.