
वृश्चिक राशीच्या व्यक्ती बऱ्याच वेळा प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल कोणताही विचार न करता निर्णय घेतात. याच कारणामुळे काही महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांना सर्वच गोष्ट चुकीच्या वाटू लागतात. त्यामुळे नाते परिपूर्ण होत नाही.

कन्या राशीच्या लोकांमध्येही अयशस्वी संबंध असण्याची शक्यता असते. याचे कारण त्यांना त्यांच्या नात्यात परिपूर्णता हवी असते. एका चुकीमुळे त्यांना समोरच्या व्यक्तीबद्दलचा रस कमी होऊ लागतो.

कर्क राशीसाठी नाते टिकवणे खूप अवघड असते. कर्क राशीच्या लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे नाते यशस्वी होत नाही. असे नाही की ते त्यांचे नाते यशस्वी करू इच्छित नाहीत.

वृषभ राशीच्या लोकं सुद्धा नातेसंबंध टिकवण्यात अयशस्वी ठरतात. त्यांच्या जोडीदाराकडून अनेकदा खूप अपेक्षा असतात. त्यामुळे समोरची व्यक्ती कधीही कोणत्याही प्रकारे आनंदी राहू शकत नाही. यामुळेच या राशीचे नाते जास्त काळ टिकत नाही.