कोल्हापुरात उद्धव ठाकरे-फडवीसांची तोफ धडाडली!
कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याशी काय लढणार? यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. कोल्हापुरातील तपोवन मैदानात शिवसेना-भाजप युतीची महासभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेना-भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि […]
कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याशी काय लढणार? यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. कोल्हापुरातील तपोवन मैदानात शिवसेना-भाजप युतीची महासभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेना-भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुफान टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- मुंबईत अरबी महासागर, कोल्हापुरात जनसागर – देवेंद्र फडणवीस
- भाजप-सेनेची युती केवळ सत्तेकरता नाही, ही विचारांची युती आहे, आम्हाला अभिमान आहे की, आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत – देवेंद्र फडणवीस
- केवळ नावामध्ये राष्ट्रवाद असून चालत नाही, मनात असायला लागतो, आमच्या मनात राष्ट्रवाद आहे – देवेंद्र फडणवीस
- हे काय आमच्याशी लढणार, यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघारी घेतली – देवेंद्र फडणवीस
- देश 56 पक्षांवर चालत नाही, देश चालवण्यासाठी 56 इंचाची छाती लागते – देवेंद्र फडणवीस
- काँग्रेस राष्ट्रवादीला चॅलेंज देतो, तुमचे 15 वर्षातील आकडे आणि मी 5 वर्षांचे आकडे आणतो, आम्हीच पश्चिम महाराष्ट्राला सर्वात जास्त पैसे दिले – देवेंद्र फडणवीस
- आम्हाला कदाचित ऊसातला कळत नसेल. मात्र, जाणत्या राजाने जेवढे निर्णय ऊस कारखानादारांसाठी घेतले नाहीत, तेवढे निर्णय मोदींच्या सरकारने घेऊन दाखवले. कारण आम्हाला साखरसम्राटांचं भलं करायचं नव्हतं – देवेंद्र फडणवीस
- बारामतीच्या पोपटाला सांगोत, आमचे कपडे कुणीच उतरवू शकत नाही – देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
- मोदी सूर्यासारखे, त्याच्याकडे थुंकल्यावर थुंकी आपल्यावर पडते – देवेंद्र फडणवीस
- जयंत पाटील म्हणतात, भाजप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, मग तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का? – देवेंद्र फडणवीस
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- सेना-भाजप युती झाल्याने, काँग्रेस-राष्ट्रवीचे टायर पंक्चर झालेत – उद्धव ठाकरे
- आम्हाला सत्ता पाहिजे, मात्र आम्ही खुर्चीचे वेडे नाहीत – उद्धव ठाकरे
- आमची सत्ता आल्यानंतर लवकरात लवकर राम मंदिर उभं राहील – उद्धव ठाकरे
- काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना गिरीश महाजनांची भीती वाटते – उद्धव ठाकरे
- देव, देश आणि धर्मासाठी युती – उद्धव ठाकरे
- कोल्हापुरात फक्त भगवाच फडकला पाहिजे – उद्धव ठाकरे
- विरोधी पक्ष सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत आणि पवारसाहेब सांगत आहेत की, मी सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला दिला आहे. मग पवारसाहेब सांगून टाका की पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदीच ठरला आहे – उद्धव ठाकरे
- देवेंद्रजी पवारांना भाजपमध्ये घेऊ नका, त्यांची जागा जनतेने दाखवली आहे. – उद्धव ठाकरे
- कोल्हापूर हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला – उद्धव ठाकरे
- राष्ट्रवादीला मत देणार असाल, तर अजित पवार धरणं कशी भरतात हे आठवा – उद्धव ठाकरे