राहुल गांधींचा पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद : 10 महत्त्वाचे मुद्दे
पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील भारती विद्यापीठात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. राजकीय विषयांसह वैयक्तिक विषयांवरही राहुल गांधी यांनी यावेळी मनमोकळा संवाद साधला. अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. निवडक विद्यार्थ्यांनी थेट राहुल गांधी यांना प्रश्न विचारले. राहुल गांधी यांच्या संवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे : हजारो लोकांशी चर्चा […]
पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील भारती विद्यापीठात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. राजकीय विषयांसह वैयक्तिक विषयांवरही राहुल गांधी यांनी यावेळी मनमोकळा संवाद साधला. अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. निवडक विद्यार्थ्यांनी थेट राहुल गांधी यांना प्रश्न विचारले.
राहुल गांधी यांच्या संवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे :
- हजारो लोकांशी चर्चा करुन, प्रचंड विचारपूर्वक काँग्रेसने जाहीरनामा तयार केलाय – राहुल गांधी
- जेव्हा एखादी गोष्ट करण्याची मी ठरवतो, ते मी करतोच, हा माझा स्वभाव आहे – राहुल गांधी
- जर तुम्ही सत्य स्वीकारलात, तर धाडस मिळतं – राहुल गांधी
- भारतात 27 हजार नोकऱ्या प्रत्येक 24 तासाला कमी होत आहेत, बेरोजगारी वाढतेय – राहुल गांधी
- जाहीरनाम्यातील वार्षिक 72 हजार रुपयांचं आश्वासन खूप रिसर्च करुन दिलंय – राहुल गांधी
- राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय गरजेचे. त्यासाठी रणनीती गरजेची असते, नियोजन आयोग रणनीती ठरवतं, तर नीती आयोग क्लृप्त्या लढवतं – राहुल गांधी
- सत्तेत आल्यास महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवणार – राहुल गांधी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे प्रश्नांना सामोरे का जात नाहीत? – राहुल गांधी
- मला नरेंद्र मोदी आवडतात, नरेंद्र मोदींविषयी कोणताही राग,द्वेष मनात नाही – राहुल गांधी
- राजकारणात निवृत्तीचं वय असायला हवं. 60 वर्ष हे राजकीय निवृत्तीचं वय असू शकतं – राहुल गांधी
WATCH: CP @RahulGandhi in conversation with our changemakers in Pune. #RahulGandhiStudentsInteraction https://t.co/WpDME1pANO
— Congress (@INCIndia) April 5, 2019