राज्याचं लक्ष लागलेले 10 मतदारसंघ आणि त्यांच्या निवडणुका

मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिल ते 29 एप्रिल या दरम्यान चार टप्प्यात मतदान होईल. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील खालील 10 लोकसभा मतदारसंघांकजे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात कधी निवडणूक आहे आणि तिथे काय स्थिती आहे, हे खालील प्रमाणे : माढा : 23 […]

राज्याचं लक्ष लागलेले 10 मतदारसंघ आणि त्यांच्या निवडणुका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिल ते 29 एप्रिल या दरम्यान चार टप्प्यात मतदान होईल. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील खालील 10 लोकसभा मतदारसंघांकजे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात कधी निवडणूक आहे आणि तिथे काय स्थिती आहे, हे खालील प्रमाणे :

माढा : 23 तारखेला मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील हे माढ्यातून विद्यमान खासदार आहेत. मात्र, यंदा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे माढ्यातून लढणार असल्याने येथील चुरस वाढली आहे. तसेच, राज्याचंही लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे.

जालना : 23 एप्रिलला मतदान

जालना मतदारसंघातून सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील हे विद्यमान खासदार आहेत. यंदाही तेच निवडणूक लढतील, हे स्पष्ट असलं तरी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंना जेरीस आणलं आहे. खोतकर जालन्यातून लढण्यासाठी इच्छुक असून, तिकिटासाठी अगदी बंडापर्यंत खोतकरांनी ताणून धरलं आहे. त्यामुळे जालन्यात काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे : 23 एप्रिलला मतदान

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल शिरोळे विद्यमान खासदार आहेत. मात्र, या जागेवरुन संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड आणि खासदार संजय काकडे इच्छुक आहेत. यातील कुणाला उमेदवारी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, पुणे लोकसभेची जागा चुरशीची ठरणार आहे.

अहमदनगर : 23 एप्रिलला मतदान

भाजपचे दिलीप गांधी हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. इथून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील इच्छुक आहेत. सुजय विखे 12 मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची असेल.

कोल्हापूर : 23 एप्रिलला मतदान

कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विद्यमान खासदार आहेत. मात्र धनंजय महाडिक यांना गेल्यावेळी जिंकण्यासाठी सर्वात मोठी मदत मिळाली ती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची. यावेळी दोघेही जण एकमेकांच्या विरोधात आहेत. शिवाय, महाडिकांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ नाराज आहेत. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रायगड : 23 एप्रिलला मतदान

शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते हे रायगड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. मात्र, गेल्यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे अवघ्या 2100 मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे यंदा पुन्हा गीते विरुद्ध तटकरे लढत झाल्यास, गीते यांची वाट खडतर असेल. त्यामुळे इथला निकाल काय असेल, याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : 23 एप्रिलला मतदान

शिवसेनेचे नेते विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. त्यांनी गेल्यावेळी नारायण राणेंचे सुपुत्र डॉ. निलेश राणे यांचे पराभूत केले होते. मात्र, यावेळी निलेश राणे यांनी प्रचारादरम्यान मतदारसंघ पिंजून काढला आहे. शिवाय, विनायक राऊतांना गेल्यावेळी मोदी लाटेचा फायदा झाला होता.

नागपूर : 11 एप्रिलला मतदान

भाजपचे ताकदवान नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातून खासदार आहेत. नागपूर हा भाजप आणि गडकरींचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र इथून यावेळी काँग्रेसकडून नाना पटोले हे गडकरींना टक्कर देण्याची शक्यता आहे.

मावळ : 29 एप्रिलला मतदान

शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळमधून खासदार आहेत. मात्र या मतदारसंघातून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे लढण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, पार्थ पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कमोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष असेल.

शिरुर: 29 एप्रिलला मतदान

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या शिरुर मतदारसंघातून सध्या शिवाजीराव अढळराव पाटील हे खासदार आहेत. मात्र इथून राष्ट्रवादीकडून अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे हेही इच्छुक आहेत. त्यामुळे या लढतीकडेही लक्ष लागलं आहे.

दोन महत्त्वाच्या बातम्या :

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा

तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.