AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : खासदार सोडून गेले फरक पडत नाही; 10 हजार शिवसैनिक प्रमाणपत्र घेऊन ‘मातोश्री’वर जाणार, बडगुजर यांची माहिती

नाशिकमधून दहा हजार शिवसैनिक प्रतिज्ञापत्र घेऊन मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे.

Nashik : खासदार सोडून गेले फरक पडत नाही; 10 हजार शिवसैनिक प्रमाणपत्र घेऊन 'मातोश्री'वर जाणार, बडगुजर यांची माहिती
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 2:00 PM

नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंडखोरी करत शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. सुरुवातीला शिंदे यांना शिवसेनेतील आमदाराच्या एका मोठ्या गटाने पाठिंबा दिला होता. मात्र शिंदे हे मुख्यमंत्री होताच शिवसेनेतून शिंदे गटात सामील होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या संख्येत वाढच होताना दिसून येत आहे. शिवसेनेच्या खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र अशाही परिस्थितीमध्ये नाशिकमधील (Nashik) शिवसैनिक हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत ठामपणे उभे असल्याचे पहायला मिळत आहेत. कालच नाशिकमधील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तर आता आणखी दहा हजार शिवसैनिक प्रतिज्ञापत्र घेऊन मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली आहे.

शिवसेनेकडे अनेक तगडे उमेदवार

यावेळी बोलताना सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदार आणि खासदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. खासदार शिवसेनेला सोडून गेले तर काही फरक पडत नाही. नाशिकमधील सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. कांदे यांच्या जागेवरून नांदगाव मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छूक आणि तगडे उमेदवार शिवसेनेकडे आहेत. खासदारांनी आतापर्यंत भाजपचीच कामे केली अशी टीका यावेळी त्यांनी केली. तसेच जे-जे शिवसेनेला सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत, त्यांच्या जागी निवडणूक लढवण्यास प्रत्येक मतदारसंघात तीन ते चार उच्छूक उमेदवार असल्याचे देखील बडगुजर यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

दहा हजार शिवसैनिक मातोश्रीवर जाणार

पुढे बोलताना  बडगुजर म्हणाले की, कोणी कुठेही जाऊद्यात, नाशिकमधील शिवसेना कायम एकसंघ आहे. नाशिकमधील शिवसैनिक हे कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणार आहेत. नगरसेवकांच्या भेटीनंतर आता आणखी दह हजार शिवसैनिक एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र घेऊन मातोश्रीवर जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रविवारीच नाशिकमधील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ही भेट आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमध्ये महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची महीती समोर येत आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.