New Delhi : मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी! राहुल कुल आणि जयकुमार गोरेंची फसवणूक करण्याचा प्रयत्न

हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर मी घातला. कारण यापूर्वीदेखील असे प्रकार झाले होते. त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना मुंबईच्या आयुक्तांना दिल्या.

New Delhi : मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी! राहुल कुल आणि जयकुमार गोरेंची फसवणूक करण्याचा प्रयत्न
राहुल कुल/जयकुमार गोरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 2:57 PM

नवी दिल्ली : नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. आमदार राहुल कुल यांना आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ठाण्यातील दोघांचा यामध्ये समावेश आहे. सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हा सापळा लावण्यात आला होता. कारवाईवेळी आमदार राहुल कुल यांच्यासोबत जयकुमार गोरेदेखील (Jaykumar Gore) उपस्थित होते. याप्रकरणी राहुल कुल म्हणाले, की मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मी त्याला ओळखत नव्हतो. मंत्रीपद मिळवून देण्यासाठी काहीतरी करू शकतो, असे ती व्यक्ती म्हणाल्याचे राहुल कुल (Rahul Kul) यांनी सांगितले. दरम्यान, जयकुमार गोरे आणि राहुल कुल सध्या नवी दिल्लीत आहेत.

‘आकडा आमच्या कल्पनेबाहेरचा’

हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर मी घातला. कारण यापूर्वीदेखील असे प्रकार झाले होते. त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना मुंबईच्या आयुक्तांना दिल्या. त्यांनी क्राइमचे जॉइन्ट सीपी यांना सांगितले. जो आकडा त्या व्यक्तीने सांगितला होता, तो सर्वांच्या कल्पनेच्या पलिकडचा होता. मात्र अशाप्रकारे फसवणूक होत असल्याचे माझ्या प्रथमदर्शनी लक्षात आले. आपल्यासारख्यांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये, म्हणून पुढे आले पाहिजे यादृष्टीनेच आम्ही ही सर्व प्रक्रिया केली आहे, असे राहुल कुल म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले राहुल कुल?

‘आम्ही अडकण्याचा प्रश्नच नव्हता’

जयकुमार गोरे म्हणाले, की आम्ही अडकण्याचा प्रश्नच नव्हता. कारण आम्हाला काही अपेक्षाच नव्हती. पहिल्या फोनपासून आम्ही दोघे सोबत होतो. त्यावेळेसच आम्हाला कळाले होते, की हा फेक माणूस आहे. त्यामुळे आमची कोणतीही फसवणूक झालेली नाही. आम्ही कोणत्या आमिषाला बळीदेखील पडलेलो नाहीत. मात्र अशा प्रवृत्तींना अटकाव झाला पाहिजे, म्हणूनच पोलीस कारवाई झाली. आता पुढील चौकशी पोलीस करतील, असे जयकुमार गोरे यांनी सांगितले. दरम्यान, चौघांना अटक करण्यात आली आहे, त्यातील दोघे ठाण्यातील आहेत.

काय म्हणाले जयकुमार गोरे?

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.