Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray :…तर बंडखोरांनी सांगावं, मी आत्ता CMपदाचा राजीनामा देतो, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुख्य 12 मुद्दे, जाणून घ्या…

बंडखोरांनी समोरासमोर येऊन मला सांगावं, मी आत्ता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले मुख्य 12 मुद्दे

Uddhav Thackeray :...तर बंडखोरांनी सांगावं, मी आत्ता CMपदाचा राजीनामा देतो, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुख्य 12 मुद्दे, जाणून घ्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 6:31 PM

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदा माध्यमांसमोर आले. अर्धा तास उशिरा मुख्यमंत्री माध्यमांसमोर आल्यानं अवघा महाराष्ट्र त्यांचं भाषण ऐकण्यासाठी ताटकळत टीव्ही समोर बसलेला होता. एकनाथ शिंदेंच्या (Ekanath Shinde) बंडाळीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची डोकेदुखी वाढली आहे. यानंतर मुख्यमंत्री समोर येत माध्यामांसमोर कधी येणार, मुख्यमंत्री (CM) माध्यमांसमोर का येत नाही, असं बोललं जाऊ लागलं. अखेर आज मुख्यमंत्री माध्यमांसमोर आलेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडपासून सुरुवात केली.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्दे मांडले. यावेळी कोविड, बाळासाहेबांची शिवसेना, हिंदुत्व, एकनाथ शिंदे यावर त्यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्रींचं भाषण 12 मुद्द्यात समजून घेऊया…

  1. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर मोलाचा प्रश्न आहे. आम्हाला तुम्ही नको आहात असं मानत असतील तर काय, मी त्यांना आपले मानतो, ते मानतात का मला माहित नाही.
  2. सूरतहून मला निरोप देू नका, मला समोरासमोर येऊन सांगा, मी आत्ता राजीनामा देतो, मी पत्र लिहून ठेवतो आहे. मला समोरासमोर येऊन सांगा
  3. मी वर्षा निवासस्थआन सोडून आज मातोश्री निवासस्थानाकडे जातो आहे. मला खुर्चीला चिटकून बसण्याची अजिबात इच्छा नाही.
  4. मी राजीनामा लिहून ठेवतो, बंडखोरांनी समोर यावं, पत्र घएऊन राजभवनावर जावं, राज्यपाल म्हमाले तर मीही यायला तयार आहे.
  5. अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची माझी इच्छा नाही, एकही मत माझ्याविरोधात गेले, तरी मला वाईट वाटेल. त्यामुळे समोर येून सांगा, मी मुख्यमंत्रीपद सोडतो.
  6. शिवसैनिकांनी मला सांगावे, त्यांनी सांगितले तर शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्याचीही तयारी आहे. पण शिवसैनिकांनी मला हे सांगावे.
  7. संख्या कुणाकडे किती आहे हा विषय गौण आहे. ती संख्या कशी जमवता, ती प्रमाने जमवता का, हे महत्त्वाचे आहे.
  8. मुख्यमंत्रीपद मिळाले ते वेगळ्या स्थितीत मिळाले, शरद पवारांनी ही जबाबदारी घेण्याचे सांगितले म्हणून घेतली. सोनिया गांधी आणि पवारांनी वेळोवेळी मदत केली.
  9. जबाबदारी नसताना मी माझअया परीने जिद्दीने काम करण्याचा प्रयत्न केला. कोविड स्थितीत चांगले काम केले
  10. बाळासाहेबांचे हिंदुत्व कुठल्याही स्थितीत सोडलेले नाही. विधानसभेत हिंदुत्व बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री, मध्यंतरीच्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेमुळे मिळालं
  11. आजारी होतो, ऑपरेशन झाले होते, त्यानंतर मी अनेकांना भेटण्यास सुरुवात केली आहे. हा आक्षेप मान्य आहे, पण कामे अडली नव्हती.
  12. पदावर बसल्यावर जे काम करता ती कमाई असतो, त्यात मला अनेकांनी अनेकदा कौतुकच केले आहे.
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.