कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांसाठी 360 कोटींचा निधी मंजूर, रस्ते चांगले होणार, वाहतूक कोंडीतून सुटका होईल : खा. श्रीकांत शिंदे
कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी एमएमआरडीएने 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी एमएमआरडीएने 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि एकूणच रस्त्यांच्या दुरावस्थेतून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून कल्याण-डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होईल, अशी अपेक्षा खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलून दाखवली. (360 crore sanctioned for roads in Kalyan Dombivali Says MP Dr Shrikant Shinde)
MMRDA कडून 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर
कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी एमएमआरडीएने 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याआधी देखील डोंबिवली एम.आय.डी.सी. निवासी विभागातील रस्त्याच्या कामासाठीही एकूण 110 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.
अनेक बैठकांनंतर MMRDA चा निधीसाठी हिरवा कंदील
कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे रस्ते विकासासाठी MMRDA ने निधी द्यावा अशी मागणी खासदार श्रीकांत यांनी केली होती. याबाबत अनेक बैठका झाल्या अखेर MMRDA ने निधीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
वाहतूक कोंडीतून कल्याण डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होईल
MMRDA च्या निधीमुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, अस्तित्वातील डीपी रस्त्यांचा विकास, दुपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. सदर विकासकामे एमएमआरडीए प्रशासन स्वतः करणार आहे. त्यामुळे पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि एकूणच रस्त्यांच्या दुरावस्थेतून आणि निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून कल्याण-डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होईल, अशी अपेक्षा खासदार शिंदे यांनी बोलून दाखवली .
हे ही वाचा :
लसीकरणाअभावी तिसरी लाट रोखणार कशी? खासदार श्रीकांत शिंदेंचा केंद्राला सवाल