भाजपच्या पहिल्या यादीतील 9 महत्त्वाचे मुद्दे
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गुजरातमधून अमित शाह यांच्या रुपाने एकमेव उमेदवार पहिल्या यादीत जाहीर केला आहे. यांसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी भाजपच्या पहिल्या यादीतून समोर आल्या आहेत. यातील निवडक 9 महत्त्वाचे मुद्दे : मुद्दा क्र. 1 पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा पुन्हा एकदा वारणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील. पहिल्याच यादीत नरेंद्र […]
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गुजरातमधून अमित शाह यांच्या रुपाने एकमेव उमेदवार पहिल्या यादीत जाहीर केला आहे. यांसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी भाजपच्या पहिल्या यादीतून समोर आल्या आहेत. यातील निवडक 9 महत्त्वाचे मुद्दे :
मुद्दा क्र. 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा पुन्हा एकदा वारणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील. पहिल्याच यादीत नरेंद्र मोदी यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
मुद्दा क्र. 2
भाजपचे दोन माजी अध्यक्ष राजनाथ सिंह (लखनौ मतदारसंघ) आणि नितीन गडकरी (नागपूर मतदारसंघ) यांचीही पहिल्या यादीत नावं आहेत.
मुद्दा क्र. 3
अमेठी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टक्कर देतील. भाजपच्या पहिल्या यादीत स्मृती इराणी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
मुद्दा क्र. 4
गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी लढणार नाहीत. अडवाणींचे नाव पहिल्या यादीत नाही. किंबहुना, ते यंदात निवडणूक लढतील का, याबाबतही शंका आहे.
मुद्दा क्र. 5
गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह लढणार आहेत. या जागेवरुन गेल्यावेळी लालकृष्ण अडवाणी लढले होते.
मुद्दा क्र. 6
भाजपच्या पहिल्या यादीत गुजरातमधून अमित शाह यांच्या रुपाने एकच उमेदवार घोषित केला आहे.
मुद्दा क्र. 7
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा मथुरा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
मुद्दा क्र. 8
भाजपचे वाचाळवीर नेते साक्षी महाराज यांना पुन्हा एकदा उन्नाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्यात आली आहे.
मुद्दा क्र. 9
भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवार घोषित झाले असून, दोन विद्यमान खासदारांचं (दिलीप गांधी आणि सुनील गायकवाड) तिकीट भाजपने कापलं आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.