अजितदादा यांच्या गटातील एका मंत्र्याने दिला राजीनामा, रोहीत पवार यांचा गौप्यस्फोट

राज ठाकरे यांनी दिल्लीवारी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहीत पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज ठाकरे यांनी ईडी कारवाईला घाबरून जर भूमिका बदलली असेल तर ते चुकीचे आहे. त्यांनी महाशक्तीच्या विरोधात महाराष्ट्रासाठी लढण्याची गरज असल्याचे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

अजितदादा यांच्या गटातील एका मंत्र्याने दिला राजीनामा, रोहीत पवार यांचा गौप्यस्फोट
rohit pawarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 8:52 PM

मुंबई | 18 मार्च 2024 : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. राज ठाकरे यांच्या सोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे देखील आहेत. राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसातील ही दुसरी वारी असल्याचे म्हटले जात आहे. मनसेची महायुतीत त्यामुळे एण्ट्री होणार का असा सवाल केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहीत पवार यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. आज महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हीतासाठी या महाशक्तीविरोधात लढणाऱ्या व्यक्तीची गरज असताना राज ठाकरे यांनी भाजपात जाऊ नये अशी मागणीही रोहीत पवार यांनी केली आहे. तसेच अजितदादा गटातील एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोटही रोहीत पवार यांनी केला आहे.

रोहीत पवार पुढे म्हणाले की राज ठाकरे यांच्या भाषणाचा आपणही चाहते आहोत. त्यांनी केंद्राविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राच्या हीतासाठी महाविकास आघाडीत यायला हवे. साल 2019 मध्ये भाजपाने छोट्या पक्षांना फाट्यावर मारले होते. मात्र आता पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे. म्हणून त्यांनी छोट्या पक्षांना भाव देण्याचे धोरण आरंभले असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. अजितदादा गटातील एका मंत्र्याने एक-दीड महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. कृषी खात्याशी संबंधित हा मंत्री आहे. शेतक-यांच्या कुठल्याही प्रश्नावर सध्या चर्चा होत नाही, त्यामुळे कंटाळून त्याने राजीनामा दिला आहे. शेतकरी सध्या वाऱ्यावर आहेत. अजितदादा गटातील अनेक आमदार भाजपात जाणार आहेत आणि उरलेले आमच्याकडे येणार असल्याचा दावाही रोहीत पवार यांनी केला आहे.

नाशिकची जागा आम्हाला मिळावी

नाशिकची जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे. मात्र सध्या यावर चर्चा सुरू आहे. आम्ही जास्त जागा लढू शकतो. मात्र आघाडीत चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, त्यामुळे नाशिकच्या जागांवर लवकरच निर्णय होईल असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे. रोहीत पवार यांच्या बारामती एग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कारखान्याची ईडीने मोठी कारवाई केली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.