Eknath Shinde vs Shivsena : शिवसेनेच्या ‘कार्यकारिणी’त 4 प्रस्ताव, एकनाथ शिंदेंची नेतेपदावरुन हकालपट्टी? नेमकं काय ठरलं? जाणून घ्या…
Eknath Shinde vs Shivsena : शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण 6 प्रस्ताव ठेवण्यात आले. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केलं. चांगलं काम केल्यानं अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. यामुळे आता एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरच कायम ठेवणं, यामागे सेनेचं काय गणित आहे, त्याबाबत चर्चा रंगली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अॅक्शन मोडमध्ये आलेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पक्षाकडून त्यांचं नेतेपद काढलं जातं का, याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, शिवसेनेच्या कार्यकारणी बैठकीमधून एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार, शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण 4 प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदेंची हकालपट्टी होण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी पक्ष उभा असेल, असाही प्रस्ताव आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केलं. चांगलं काम केल्यानं अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. यामुळे आता एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरच कायम ठेवणं, यामागे सेनेचं काय गणित आहे, त्याबाबत चर्चा रंगली आहे.
कार्यकारणीतील चार प्रमुख गोष्टी
- शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि राहिल.
- मराठी अस्मितेशी कधीच प्रतारणा करणार नाही
- शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे
- एकनाथ शिंदेंची हकालपट्टी होण्याची शक्यता कमी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी पक्ष उभा
- कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केलं
- उद्धव ठाकरेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
बंडखोर आमदारांचं निलंबन?
शिवसेनेने पक्षादेश न पाळल्यामुळे जवळपास 16 आमदारांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे यावर देखील चर्चा होऊ शकते. एकीकडे निलबंन रद्द करण्यासाठी कारवाई सुरु केली आहे. यासंदर्भातील पत्र शिवसेनेने विधानसभेच्या उपाध्यक्षांना दिलं आहे. त्यामुळे शिंदे गटासमोरील या क्षणाचं हे सर्वात मोठं आव्हान आहे. याला कायदेशीर रित्या कसं सामोरं जावं, यासंबंधीची चर्चा आज गुवाहटीत होणाऱ्या बैठकीत केली जाईल. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या कार्यकारिणीत यावर काय निर्णय घेतला जातो, हे पहावं लागेल.
आकडे आणि दावे
- शिंदे यांच्यासोबत जवळपास 47 आमदार आहेत, असा दावा केला जातोय
- एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना निलंबित करण्याची मागणी
- उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 आमदार असल्याचा दावा
- भावना गवळी, श्रीकांत शिंदे हे दोन्ही शिंदे गटासोबत, किर्तीकर यांचा दावा
- शिवसेनेकडून बहूमत सिद्ध करण्याचा दावा
- त्यामुळे नेमके कुणाकडे किती आमदार, हे सिद्ध होत नाही
- शिवसेना आणि शिंदे गटाकडून आमदारांच्या संख्येत नेहमी बदल होतोय
- दोन तृतीयांश संख्या शिंदे गटाकडे असल्याचा दावा देखील त्यांनी यापूर्वी केलाय
- संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत येण्याचा इशारा दिलाय
- गुवाहाटी ते मुंबई अशी चाललेली रेस कधी संपणार याची उत्सुकता आहे
- भाजपकडून सरकार स्थापनेची ऑफर आल्याचा दावाही करण्यात येतोय.