Aaditya Thackeray on Eknath Shinde : ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला, आदित्य ठाकरेंचं पुन्हा शिंदे गटावर टीकास्त्र

आज दिवसभरातून दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे गटावर आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे हे नेहमीच मैदानात आहेत,'

Aaditya Thackeray on Eknath Shinde : ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला, आदित्य ठाकरेंचं पुन्हा शिंदे गटावर टीकास्त्र
आदित्य ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 2:00 PM

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी ही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटावर केली आहे. यावरुन पुन्हा एकदा शिंदे आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद उफाळून आल्याचं दिसतंय. आज दिवसभरातून दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे गटावर आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे हे नेहमीच मैदानात आहेत,’  असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत. तर याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधलाय. माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत हे दोन्ही नेते वारंवार एकनाथ शिदे गटाला लक्ष करताना दिसत आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा पाठित खंजीर खुपसल्याचा उल्लेख केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

निष्ठा यात्रेदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधलाय. यावेळी ते म्हणाले की, शिवसैनिकांचं प्रेम घ्यायला आलोय. ठाकरे नेहमी मैदानातच आहेत.  ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पाठित खंजीर खुपसला, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. जे निष्ठावान आहेत ते मातोश्रीवर येतील. निष्ठावानांसाठी मातोश्रीची दारं सदैव खुली असतील,’ असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

स्थगिती सरकार-ठाकरे

आज आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर दुसऱ्यांदा निशाणा साधलाय. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करताना स्थगिती सरकार असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की, ‘ हे सरकार पण स्थगिती सरकार होणार का, असा सवाल करत ‘ते आमच्यावर टीका करायेच, आज तेच कामांना स्थगिती देत आहेत,’ असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.

शिंदे गटाला सुनावलं

सकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला सुनावताना म्हटलं की, ‘माझ्यावर खास प्रेम करण्याची त्यांना गरज नाही. अन्यथा त्यांनी आमच्या पाठित खंजीर खूपसला नसता. शिवसेना ही आपली आहे आणि चिन्हही आपलेच आसणार आहे,’ असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.