गद्दार सरकार आल्यावरच एक इंजिन फेल का गेलं?; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. तुमचाही नाही. माझाही नाही. उद्योजकांचाही नाही. राज्यात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कुणी गुंतवणूक करत नाही.

गद्दार सरकार आल्यावरच एक इंजिन फेल का गेलं?; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 12:54 PM

मुंबई: राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी थेट शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राने (maharashtra) पहिल्यांदा 80 हजार कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात आणण्यासाठी करार केले होते. केंद्र सरकार हेच होतं. राज्य सरकार महाविकास आघाडीचं (mahavikas aghadi) होतं. तरीही डबल इंजिन सुरू होतं. मग हे गद्दार सरकार आल्यावर एक इंजिन फेल का गेलं? आमचं केंद्रा सोबत चांगलं चाललं होतं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घणाघाती हल्ला चढवला आहे.

आपले मुख्यमंत्री मंडळं, दहीहंडी, राजकीय भेटी, फोडोफोडी हेच करत आहेत. हे सोडून मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात गेले नाही. शिवराज सिंह चौहान आपल्या राज्यात आले. नवीन पटनायक आपल्या राज्यात आले. त्यांनी इकडच्या उद्योजकांशी चर्चा केली. तसंच मला गेल्या तीन महिन्यात आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात जाऊन एखाद्या उद्योजकांशी चर्चा केल्याचं एक उदाहरण दाखवा. त्यांनी काहीच केलं नाही, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

हे सुद्धा वाचा

आपल्या राज्यातील उद्योगही निघून जात आहे. या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकांचा विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक उद्योग आपल्या राज्यात येणार होता, तो येत नाही. गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती. ती इतर राज्यात जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. तुमचाही नाही. माझाही नाही. उद्योजकांचाही नाही. राज्यात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कुणी गुंतवणूक करत नाही. निवडणुकीला सामोरे जायला जो माणूस तयार नाही. ज्याच्यात हिंमत नाही. तो गुंतवणूक काय आणू शकतो?; असा सवाल त्यांनी केला.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख पप्पू असा केला. त्यावर आदित्य यांनी टीका केली आहे. मी त्यांच्याबरोबर बसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी जे विचारलं ते कदाचित करत नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल. काल खाती वाटप झालं. उद्योगमंत्र्याने शेतीबद्दल ट्विट केलं आहे. कृष मंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातला आहे. कृषी मंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहीत नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठं? अशी शेरेबाजी त्यांनी केली.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.