Aaditya Thackeray : गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं? बाबाजीका ठुल्लू; गुलाबरावांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray : बंड करायला हिम्मत लागते. यांनी गद्दारी केली. गुवाहाटीला गेले, तिकडे काय काय केलं आपण पाहिलं. गुवाहातील गेल्यावर 40 गद्दार लोक स्वतःला शिवसैनिक समजत होते. मजा करत होते.

Aaditya Thackeray : गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं? बाबाजीका ठुल्लू; गुलाबरावांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 4:08 PM

जळगाव: राज्यातून शिवसेना (shivsena) संपवण्याचा कट रचण्यात आला आहे. आम्हाला एकटे पडण्याचं हे षडयंत्र आहे. पण मला राज्यातील जनतेला विचारायचं आहे, तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का?’ असा सवाल करतानाच गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं? बाबाजी का ठुल्लू, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी चढवला. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे. त्यानिमित्ताने ते आज जळगावात आले होते. जळगावातील पाचोरा या ठिकाणी त्यांनी जनतेशी संवाद साधला. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते असलेल्या गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांच्या या मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवा, असं आवाहनच त्यांनी जळगावकरांना केलं.

जळगाव मधील पाचोऱ्यात आज आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिक आणि जनतेशी शिव संवाद साधला. भर पावसात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी या सभेला उपस्थिती लावली होती. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी झाली आणि गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे. त्यांना ठाऊक आहे कोण विकास कामं करतं, खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं ते. देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे. सत्तामेव जयतेला नाही. त्यामुळे हे गद्दारांचं हे बेकायदेशीर सरकार लवकरचं कोसळणार म्हणजे कोसळणार, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक गद्दाराच्या मतदारसंघात जाणार

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांच्यात असते तर आसाममध्ये पूर आला तिथे मदत करायला गेले असते. पण मजा मारत बसले. प्रत्येक गद्दाराच्या मतदारसंघात जाऊन गदाराबद्दल सांगणार म्हणजे सांगणार, असंही ते म्हणाले.

बंड करायला हिंमत लागते, गद्दारीला नाही

सरकार गेल्याच दुःख नाही. ते तुम्ही परत आणाल. पण प्रगतीशील महाराष्ट्र रोखण्याच काम यांनी केलं. कोविड काळात आपला जनतेचा जीव वाचवण्याच काम उद्धव साहेबांनी केलं. याचं जगाने कौतुक केलं. महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांच काय होईल म्हणून त्यांच्या पोटात दुखत असेल. कोणत्याही जाती धर्मात वाद न लावणारं आपलं हिंदुत्व आहे. देशात आपलं नाव होत होतं हेच त्यांच्या पोटात दुखलं. बंड करायला हिम्मत लागते. यांनी गद्दारी केली. गुवाहाटीला गेले, तिकडे काय काय केलं आपण पाहिलं. गुवाहातील गेल्यावर 40 गद्दार लोक स्वतःला शिवसैनिक समजत होते. मजा करत होते. पण तिथला पूर त्यांना दिसला नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

हीच त्यांची लायकी

ते हिंदुत्वासाठी गेले नाहीत. एक दोन लोकांच्या स्वार्थासाठी गेले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने राजीनामा दिला. तेव्हा टेबलावर चढून बारमध्ये नाचतात तसे हातवारे करत नाचत होते. उद्धव साहेबांची शस्त्रक्रिया झाली तेव्हा या 40 जणांनी काम करण्या ऐवजी आपलं सरकार उभारायची स्वप्न पाहिली. कोणी आपल्या आई वडील वा गुरू बाबत असे करेल का? स्वतःला खोके कसे मिळतील? स्वतःचं ओके कसं होईल ते पाहत होते हे लोक. पहिली गद्दारांची बॅच गेली. त्या पैकी किती जणांना मंत्री पद मिळाले? आपल्याकडे याना चांगलं पद दिली होती. तिकडे जाऊन काय मिळालं? हीच त्यांची लायकी होती, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....