Aaditya Thackeray : 40च्या 40 आमदारांनी राजीनामा द्यावा, बघू सत्य जिंकते की सत्ता; आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान

Aaditya Thackeray : महाराष्ट्रात दोन लोकांचं जम्बो मंत्रीमंडळ आहे. काय चाललंय काही कळत नाही. पण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विकास रखडलाय याकडे दुर्लक्ष करून केवळ विरोधकांना दाबण्यासाठी गेल्या 32 वर्षात पाहिलं नाही. पक्ष फोडा, गद्दारी करा, ज्यांनी राजकिय ओळख दिली

Aaditya Thackeray : 40च्या 40 आमदारांनी राजीनामा द्यावा, बघू सत्य जिंकते की सत्ता; आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान
40च्या 40 आमदारांनी राजीनामा द्यावा, बघू सत्य जिंकते की सत्ता; आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 2:11 PM

सिंधुदुर्ग : चाळीसच्या चाळीस जागांवर निवडणुका घ्या. होऊन जाऊ द्या. सत्य जिंकतेय की सत्ता जिंकतेय होऊन जाऊ द्या, असं आव्हानच शिवसेना (shivsena) नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी बंडखोर आमदारांना आज केलं आहे. ज्यांना आपण उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) धोका द्यायचा नाही असं वाटत असेल तर त्यांनी परत यावं. त्यांच्यापैकी एकाचा मेसेज आला. गद्दार नाही विश्वासघातकी म्हणा. आता गद्दार आणि विश्वासघातकी यात फरक काय? असा सवाल करतानाच जो बुलंद आवाज आहे. प्रश्न विचारतोय ज्याचा आवाज बंद करायचा, त्याला दाबून टाकायचं हे सध्या सुरू आहे. म्हणजे आपले धंदे करायला मोकळे. आम्ही बंडखोरांना काही कमी पडू दिलं नाही. प्रेम दिला. विश्वास दिला. मतदारांनी त्यांना डोक्यावर घेतलं. त्यांच्यासाठी वैयक्तिक उपकार केले. राजकीय जीवनातही उपकार केले. तुमच्या मनात आमच्याबद्दल राग आणि द्वेष का? उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर का खुपसला? आम्ही नक्की काय बिघडवलं? वार करायचा तर छातीत करायचा. पाठीत का केला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

कुडाळ मधील शिव संवाद यात्रे दरम्यान आदित्य ठाकरे बोलत होते. कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट असल्याचं म्हणत कोकणाने कायम शिवसेनेला आणि ठाकरे परिवाराला साथ दिल्याच आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच कोकणासाठी विकासाची कामे आपण करत होतो, कोकणाला न्याय मिळत होता. शिवसेनेचा म्हणजेचं कोकणाचा आवाज मोठा होत होता. यावेळी कोकणासाठी केलेली विकास कामं आणि त्यासाठी केलेला पाठपुरावा याचे साक्षीदार समस्त कोकणजन आहेत. कोकण गद्दारांना क्षमा करणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज्यात घाणेरडं राजकारण सुरू

महाराष्ट्रात दोन लोकांचं जम्बो मंत्रीमंडळ आहे. काय चाललंय काही कळत नाही. पण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विकास रखडलाय याकडे दुर्लक्ष करून केवळ विरोधकांना दाबण्यासाठी गेल्या 32 वर्षात पाहिलं नाही. पक्ष फोडा, गद्दारी करा, ज्यांनी राजकिय ओळख दिली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसा. हे कधीही महाराष्ट्रात झालं नाही. असं घाणेरडं राजकारण सुरू आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

उपकार करूनही पाठीत खंजीर का खुपसला?

शिवसेनेशी उद्धव साहेबांशी गद्दारी करून सरकार स्थापन केलं. पण गद्दारी करणाऱ्या या सर्वांना सगळ दिलं, काही कमी केलं नाही. गोव्यात टेबलावर नाचणारे लोकप्रतिनिधी, तुमचा चेहरा होऊ शकतात का? शिवसेनेचे उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना डोक्यावर उलून घेतलं. त्यांच्यावर उपकार करूनही पाठीत खंजीर का खुपसला? वार करायचा होता तर छातीवर करायचा होता. उद्धव ठाकरे आजारी असताना खंजीर खुपसला हे दुख आहे. मला कुणाची लायकी काढायची नाही. कारण माझं वय काढतील. तुम्हाला रहायचं आहे तिकडेच रहा, लाज बाळगा. पण ज्या गद्दारांना थोडीतरी लाज असेल त्यांनी परत यावे. आमचे मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असंही ते म्हणाले.

ते तुमचे काय होणार?

हे गद्दार म्हणजे गद्दारचं. जेव्हा माणूस आजारी होता, हलू शकत नव्हता त्यावेळी गद्दारांनी हे कृत्य केलं. त्यावेळी गद्दारांचे नेते पक्ष फोडत होते. वाईट काळात हे 40 गद्दार आम्हाला संभाळतील अशी आशा होती. हे गद्दार आमचे नाही, घरातल्यांचे नाही झाले, ते तुमचे काय होणार? आम्ही पून्हा पून्हा चूक करू पण शिवसैनिकांवर प्रेम देऊ. हे झुकले, त्यांनी सर्व विकलं. पण शिवसेना नावावर चालते. पैसा येतो जातो, पून्हा येतो, हे ब्रिद वाक्य माझ्या पंजोबांनी बाळासाहेबांना दिलं, त्यांनी आम्हाला दिलं. ते आम्ही पुढे नेऊ. या दु:खातून, गद्दारीतून पुढे जायचं असेल तर मला तुमची साथ हवी आशीर्वाद हवा म्हणत आदित्य ठाकरे यांनी कोकण वासीयांना साद घातली .

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.